Crime

तब्बल 250 मुलींचे लैंगिक शोषण, त्यांना लाखोंचा लावला चुना,दोन लिंगपिसाट अटकेत

पिंपरी चिंचवड वृत्तसेवा- 26 जानेवारी : केंद्रसरकारमध्ये मोठ्या पदावर IAS अधिकारी असल्याचं सांगून मॅट्रिमोनियल साईटवरून तब्बल 250 उच्चशिक्षित मुलींना फसवणाऱ्या दोन अट्टल लिंगपिसाट तथा ठगबाजांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज अटक केलेली आहे. या दोन महाठगांनी पुण्यात- 91, बंगळुरूमध्ये 142 आणि दिल्लीतील गुरगाव येथील 22 उच्चशिक्षित मुलींना व महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून मुलींपैकी अनेक जणींच लैंगिक शोषण करून त्यांना लाखोंचा चुना लावल्याचंही पोलिस तपासात निष्पन्न झालेलं आहे.या प्रकरणाबाबत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आज दिलेल्या माहितीनुसार, निशांत रमेशचंद नंदवाना आणि विशाल हर्षद शर्मा असे अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. या गंभीर प्रकरणाबाबत काही दिवसांपूर्वी पुण्यातील मनीषा धारणे नामक एक सामाजिक कार्यकर्ता तरुणी तीन पीडित तरुणींनी घेऊन वाकड पोलिस ठाण्यात आली आणि या तिघींनाही एकाच व्यक्तीने फसविल्याची तक्रार केली. त्यानुसार या प्रकरणाचा तपास वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर यांच्याकडे देण्यात आला आणि मुगळीकर यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या पथकाने महाराष्ट्रातील पुण्यासह विविध शहर, बंगळुरू व दिल्लीतील वेगवेगळ्या भागात जाऊन आरोपी विरुद्ध पुरावे गोळा केले आणि त्यांना रंगेहाथ जेरबंद करत त्यांच्याकडून 50 हून अधिक बनावट आधार कार्ड व इतर ओळखपत्र,अनेक मोबाईल आणि तब्बल 75 लाखांची रोकडही जप्त केलेली आहे.

दोघे खास मित्र मात्र सुगावा लागू दिला नाही
दोघेही आरोपी एकमेकांचे खास जीवलग मित्र होते, मात्र त्यांनी कधीही आपली मैत्री उघड केली नाही.दोघेही जीवनसाथी मॅट्रोमॉनियल साईटवर स्वतःला केंद्र सरकारचे बडे सनदी अधिकारी असल्याचे सांगायचे. या दोघांनी बनावट खाते तयार केली होती. यात विशेष म्हणजे ज्या मुलीने भेटण्यासाठी संमती दिली तिला भेटायला जातांना आलिशान गाड्यामधून जायचे, मग त्यांना लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन करायचा. त्यानंतर हॉटेलवर घेऊन जायचे. मात्र त्या नंतरचा सर्व खर्च दोन्ही आरोपी मुलींनाच करायला लावायचे. जेणेकरून पकडलो गेलो तर मुलींनीच आपल्याला हॉटेलवर आणलं आणि फसवलं असा बनाव करायचा अशी दोघांची मोडस ऑपरेंडी होती. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा सखोल तपास केला आणि दोघांचाही गोरखधंदा उद्धस्त केला.

बापरे! HR महिलेकडून उकळले तब्बल 13 लाख

तसेच अनेकदा या दोघांनी काही तांत्रिक कारणामुळे आपल्याला शासनाने नोकरीतून निलंबित केले आहे आणि परत नोकरीत घेण्यासाठी पैसे लागत असल्याचे खोटे सांगून फसवलेल्या मुलींकडून लाखो रुपये उकळले होते. तर एका प्रकरणात मोठ्या प्रोजेक्टसाठी 60 लाख रुपये लागणार असल्याचे सांगून आरोपी निशांत ने एका बड्या आयटी कंपनीत HR असलेल्या महिलेकडून तब्बल 13 लाख रुपये उकळले आणि तिचे अनेकदा लैंगीक शोषणही केल्याचं पोलिस तपासात उघड झाले.

बदनामीच्या धाकाने काही तरुणींनी तक्रारच केली नाही

यातील आरोपी निशांत आणि विशालची बोलण्याची पद्धत बघून अनेक मुलींना आरोपी फार शिक्षित नसल्याची शंका यायची. मात्र तोपर्यंत खूप वेळ झालेला असायचा कारण फसल्या गेलेल्या मुली पैशासोबत आपली अब्रूही या नराधमांच्या स्वाधीन करून बसायच्या, अशा वेळी पोलिसांकडे जावे तर चौकशीचा ससेमिरा आपल्या मागे लागेल आणि समाजात आपली बदनामी होऊन लग्नाला अडचणी येतील या भीतीने पीडित मुली समोर यायच्या नाही, मात्र काही मुली धाडसाने समोर आल्या आणि या दोघांचेही पितळ उघडे पडलं.

विकृत मानसिकतेतून शारीरिक शोषण आणि आर्थिक फसवणूक करत बनावट ओळखीच्या आधारे तब्बल अडीचशेहून अधिक मुलींना सावज बनविणारे हे दोघे आज गजाआड आहेत. ही अलीकडच्या काळातील देशातील दुर्मिळ घटना असेल जी पीडित महिला आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली अन्यथा आणखी शेकडो मुली या दोघांच्या विकृतीला बळी पडल्या असत्या. हा प्रकार आणखी कुणा सोबत घडू नये यासाठी लग्न जुळविणाऱ्या कुठल्याही मॅट्रिमोनीऑल साईटवर आपली ओळख देतांना समोरच्या व्यक्तीबद्दल पूर्ण आणि खात्रीशीर माहिती असेल तरच पुढे बोला, असं आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केलं आहे. या कामगिरीसाठी सखोल आणि धाडसी तपास केल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि त्यांच्या पथकाला साठ हजारांचे बक्षीस घोषित केलेलं आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.