Crime

तरूणीला भाईगिरी पडली महागात, “थेरगाव क्वीन”ला पोलिसांकडून अटक

पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील एका अल्पवयीन तरुणीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चिले जातायेत. त्या व्हिडीओमधील तिचा संवाद पालकांच्या चिंतेत भर घालतोय. तर पोलिसांना धक्का देणाराही ठरतोय. त्यामुळेच वाकड पोलिसांनी या “थेरगाव क्वीन” अल्पवयीन तरुणी सह तिच्या मैत्रिणी वर आज गुन्हा दाखल करत अटक केलेली आहे. वाकड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेल आहे. अत्यंत आक्षेपार्ह संवाद आणि वादग्रस्त वक्तव्य करून त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मिडिया वर व्हायरल करणाऱ्या या थेरगाव क्वीनवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे आता विखारी भाषा वापरणाऱ्या तरुणाईला चाप बसणार का ? असाही प्रश्नही यानिमित्तानं उपस्थित झालेला आहे.
गेल्या काही दिवसांपासून या थेरगाव क्वीनचे आक्षेपार्ह विधानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पालकवर्गात चिंतेचा विषय बनलेले आहे. आधी शिवीगाळ, भांडणापासून सुरु होणारी थेरगाव क्वीनची विधानं थेट हत्या करण्याच्या धमकीपर्यंत पोहोचल्याने, तिचे व्हिडिओ चर्चेत आलेले आहेत. या गंभीर प्रकाराची पोलिसांनी दखल घेत या स्वयंघोषित थेरगाव क्वीनला ताब्यात घेतलेलं आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.