निवडणूकमुंबईरंजक माहितीराजकीयवृत्तविशेष

तर…आजपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरणार, सत्तेच्या सारीपाटावर राज्यपाल केंद्रबिंदु

तर…आजपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरणार, सत्तेच्या सारीपाटावर राज्यपाल केंद्रबिंदु

मुंबई – राज्यातील सत्तेच्या सारीपाटावर आता पुन्हा एकदा सत्तास्थापनेचा नवा खेळ सुरू झाल्याने आजपासून राज्याचे राजभवन आणि राज्यपाल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरणार आहे. याबाबत सोशल मीडियावर विविध प्रकारचे मिम्स व्हायरल होत असून आज पुन्हा एकदा भाजपचे नेते हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात. तसेच ते बहुमतासाठी लागणारे पुरेसे संख्याबळ असल्याचा देखील दावा ते आज राज्यपाल यांच्याकडे जाऊन करू शकतात, अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे.

राज्यपाल रूग्णालयात भरती

मात्र,राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. कोश्यारी यांना मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यामुळे सत्तास्थापनेचा खेळ लांबणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी तब्बल 40 आमदारांसह केलेल्या बंडामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झालेला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आल्याची चिन्हे दिसू लागलेली आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांनी भाजप सह सरकार स्थापन करावे असा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलेला आहे, परंतु याबाबत अजून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून निश्चितपणे कोणताही होकार देण्यात आलेला नसल्यामुळे शिवसेनेने हा प्रस्ताव फेटाळला आल्याचे सांगण्यात येत आहे. जर मुख्यमंत्री ठाकरे यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला तर मात्र भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे त्यांच्या 105 आमदारांसह तसेच काही अपक्ष आणि शिवसेनेचे 40 बंडखोर आमदार असा एकूण 145 चा बहुमताचा आकडा गाठण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.गेल्या अडीच वर्षापूर्वी सत्ता स्थापनेपासून राज्यपाल भगतसिंग कोशारी हे अनेक दिवस बरेच चर्चेत राहिलेले होते. मध्यंतरी त्यांनी त्यानंतर राष्ट्रपती राजवट देखील लागलेली होती.तेव्हा देखील दररोज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हेच चर्चेचा केंद्रबिंदु राहिले होते. एक वर्षापूर्वी महा विकास आघाडी सरकारने त्यांच्याकडे बारा विविध क्षेत्रातून विधान परीषदेवर निवडून द्यायच्या 12 आमदारांच्या नावाची यादी दिलेली होती.मात्र त्यावरही त्यांनी कोणताही निर्णय आजपावेतो घेतलेला नाही. त्यामुळे बरेच दिवस या संदर्भात देखील राज्यपाल चर्चेत राहिलेले आहे. आता पुन्हा एकदा आजपासून सत्तास्थापनेसाठी भाजप व एकनाथ शिंदे गटाचे राजभवनकडे मार्गक्रमण झाल्यास पुन्हा एकदा राजभवन आणि राज्यपाल भगतसिंग कोशारी देशभर चर्चेचा विषय ठरणार आहे.

सत्ता स्थापनेची प्रक्रिया कशी ?

शिवसेनेतून फुटलेल्या गटाला घेऊन भाजप थेट सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही किंवा तसे करता येत नाही. यासाठी आधी विरोध पक्ष हे सरकार अल्पमतात असल्याचे पत्र राज्यपालांना देईल. त्यानंतर राज्यपाल विद्यमान सरकारला बहुमत सिद्ध करण्याच्या सूचना देतील. त्यानंतर फ्लोवर टेस्टमध्ये विद्यमान सरकारचे भविष्य ठरेल. जर सरकार बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले तर विरोधकांना राज्यपालांकडे बहुत असल्याचा दावा करावा लागेल. त्यानंतर बहुमताचा दावा करणाऱ्या गटाला बहुमत सिद्ध करायला राज्यपाल आमंत्रित करतील. बहुमत सिद्ध केल्यानंतर नवीन सरकार अस्तित्वात येईल.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.