खान्देशजळगावराजकीय

तर… जळगाव जिल्ह्याची धुरा आ. गिरीश महाजन यांच्याकडे, आ. गुलाबराव पाटील आणि आ.संजय सावकारे यांनाही मिळू शकते मंत्रीपदाची संधी

तर… जळगाव जिल्ह्याची धुरा आ. गिरीश महाजन यांच्याकडे, आ. गुलाबराव पाटील आणि आ.संजय सावकारे यांनाही मिळू शकते मंत्रीपदाची संधी

मुंबई :- शिवसेनेचे “ठाणेदार” एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात महा विकास आघाडीचे सरकार आता कोसळण्याच्या स्थितीत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा बंगला खाली करून मातोश्रीवर दाखल झालेले आहेत.आता फक्त महा विकास आघाडीचं सरकार कोसळल्याची औपचारिक घोषणा बाकी राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजून राजीनामा दिलेला नसून ते उद्या राजीनामा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे झाल्यास त्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची राजभवनात जाऊन भेट घेऊन बहुमतासह सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात. त्यानंतर त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सर्व पाठिंबा देणाऱ्या आमदारांच पत्र देऊन बहुमतासाठी बोलवावं लागणार आहे. त्यानंतर जर फडणवीस यांनी बहुमत सिद्ध केल्यास भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार यांच्या युतीतून नवं सरकार महाराष्ट्राच्या विधानसभेत अस्तित्वात येईल. या सरकारमध्ये संभाव्य मंत्री पदांमध्ये जळगाव जिल्ह्यातून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू असेलेले जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांच्याकडे जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यानंतर शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील आणि भाजपच्या कोट्यातून उत्तर महाराष्ट्रातून दलीत चेहरा म्हणून माजी मंत्री व भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना सुद्धा राज्यमंत्री पदाची संधी मिळण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या संभाव्य सरकारमध्ये जळगाव जिल्ह्याला तीन मंत्री पदे मिळण्याची दाट शक्यता हल्लीच्या राजकीय घडामोडींवरून दिसून येत आहे.मात्र अजून हा जर-तरचा संभाव्य प्रश्न आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.