क्राईम
तलाठी “लाचलुचपत” च्या जाळ्यात अडकला


जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील रहिवाशी याचे वडील मयत झाले असून त्यांचे नावे असलेल्या शेतीला घरातील सदस्यांचे नावे लावण्याच्या मोबदल्यात तलाठी यांनी २,००० रुपये मागणी करून सदर लाचेची रक्कम दिनांक २६ ऑगेस्ट २०२० रोजी स्वतः स्वीकारली.सदर कारवाई चाळीसगाव औरंगाबाद रोडवर रांजणगाव फाट्यापासुन ५०० मीटर पुढे इस्सार पेट्रोलपंपासमोर रोडवर करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की,तक्रारदार पुरुष,वय- 33,रा.चाळीसगाव,ता.चाळीसगाव,जिल्ह्या जळगाव यांच्या तक्रारदार यांचे वडील मयत झालेले असुन त्यांचे नावे असलेल्या शेतीला घरातील सदस्यांचे नावे लावण्याच्या मोबदल्यात आलोसे यांनी दि.31/07/2020 रोजी तक्रारदार यांचेकडे आरोपी संतोष प्रताप शिखरे, वय-31, तलाठी- तांबोळे बु ॥, रा- शिवशक्ती नगर,चाळीसगाव ता. चाळीसगांव, जिल्हा जळगाव वर्ग -३ यांनी पंचासमक्ष 2,000/-रूपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम दि.26/08/2020 रोजी पंचासमक्ष स्वतः स्वीकारली. सदर कारवाई चाळीसगाव औरंगाबाद रोडवर रांजणगाव फाट्यापासुन ५०० मीटर पुढे इस्सार पेट्रोलपंपासमोर रोडवर सापळा रचून पथकातील डिवायएसपी सुनिल कुराडे, पो नि . निलेश लोधी, सहा.पोलीस उप निरीक्षक रविंद्र माळी, पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.सुरेश पाटील, ना.मनोज जोशी,पोना.सुनिल शिरसाठ,पोना. जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ. नासिर देशमुख,पोकॉ.ईश्वर धनगर अशांनी मिळून केली.
सदर तपास अधिकारी निलेश लोधी,पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि.जळगांव यांच्या
मार्गदर्शनाखाली मा.श्री.सुनील कडासने पोलीसअधीक्षक,ला.प्र.वि,नाशिक परिक्षेत्र, नाशिक, मा.श्री.निलेश सोनवणे अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि,नाशिक परिक्षेत्र,नाशिक
आरोपीचे सक्षम अधिकारी मा.उपविभागीय अधिकारी चाळीसगाव भाग,चाळीसगाव उपविभागीय अधिकारी कार्यालय,चाळीसगाव यांच्या उपस्थितीत आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.