कोर्ट निकाल

“तारक मेहता” फेम “बबिताजी” ऊर्फ मुनमुन दत्ताला हायकोर्टाचा अटकपूर्व जामीन मंजूर,जातीवादी टिप्पणी प्रकरण

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने आज अभिनेत्री मुनमुन दत्ता (“तारक मेहता का उल्टा चष्मा” या लोकप्रिय हिंदी मालिकेतील बबिता अय्यरच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध अभिनेत्री ) हिला ‘भं..’ या जातीयवादी टिप्पणीबद्दल अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मागील वर्षी तिनं युट्यूब वर पोस्ट केलेला एक व्हिडिओ होता ज्यात तिनं भं.. असा जातीवाचक शब्द उच्चारला होता.
न्यायमूर्ती अवनीश झिंगन यांच्या खंडपीठाने तिला एका आठवड्यात या प्रकरणाच्या तपासात सामील होण्याच्या अधीन राहून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आणि 25 फेब्रुवारी 2022 रोजी पुढील सुनावणीसाठी प्रकरण सूचीबद्ध केलेलं आहे.

या प्रकरणात हे लक्षात घेण्यासारखे आहे की, मुनमुन दत्ता हिच्या विरुद्ध युट्यूब व्हिडिओमध्ये जातीवाचक अपशब्द वापरल्याबद्दल कलम 3(1)(u) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये एकूण पाच FIR दाखल करण्यात आले होते. तिनं उच्चारलेला शब्द ही उत्तर भारतातील अनुसूचित जाती म्हणून घोषित केलेली उपजाती आहे.

सर्व एफआयआर एकत्र करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती आणि न्यायालयाने सर्व एफआयआर एकत्र करण्याचे आदेश दिले होते आणि हांसी शहरात नोंदवलेल्या एफआयआरला मुख्य एफआयआर मानण्याचे आदेश दिले होते.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.