आंतरराष्ट्रीय

तालिबानचा अफगणिस्तानावर “सुपरसाॕनिक” कब्जा ! भारतावर होतील दूरगामी परीणाम !

संपादकिय विशेष लेख
काबुल – मागील वर्षी कतार मधील दोहा येथे झालेल्या अमेरिका आणि तालिबान यांच्यातील करारानुसार अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य पूर्णपणे माघारी घेणार असल्याची घोषणा केली होती. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने आपले सैन्य माघारी घेतल्यानंतर तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानवर कब्जा करण्यासाठी रक्तरंजित संघर्ष सुरू केला आहे. या गृहयुद्धाचे दुष्परिणाम आता अफगाणिस्तानच्या जनतेला पुढील काही वर्षे नक्कीच भोगावे लागणार आहे. आज संपूर्ण अफगणिस्तानात अराजकता माजलेली असून नागरिक देश सोडून पळून जाताना दिसत आहे. येणाऱ्या “तालिबानराज” मुळे भारतासह संपूर्ण जगावर मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होणार असल्याचे संकेत मिळालेले आहेत. मात्र संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा करण्यासाठी तालिबानने ज्या पद्धतीने “सुपरसॉनिक” कूच केली आणि अफगाणिस्तानच्या प्रशिक्षित व अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या साडेतीन लाख लष्कराने ज्या पद्धतीने 80 हजार तालिबानीं पुढे गुडघे टेकले त्याबाबत सामरीक तज्ज्ञांनी संशय व्यक्त केलेला आहे. यात पडद्यामागे नक्कीच काहीतरी मोठ्या हालचाली झाल्या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

राष्ट्रपती अश्रफ गनी यांचा राजीनामा ?
आज भारतात 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे भारताचा मित्रदेश असलेल्या अफगणिस्तावर तीन वाजेच्या सुमारास तालिबानच्या विद्रोहिंनी काबुल मध्ये सशस्त्र प्रवेश करून राष्ट्रपती भवनासह शासकीय कार्यालयांवर कब्जा केलेला आहे.आता तिथे सत्ता हस्तांतरणासाठी अश्रफ गणी सरकारसोबत तालिबानी नेत्यांची बोलणी सुरू झालेली आहे.

तालिबान राज चे दुरगामी परीणाम
आज होणाऱ्या करारामुळे संपूर्ण अफगानिस्तानवर आता अब्दुल गणी बरदार या तालिबानी नेत्याच्या नेतृत्वाखालील तालिबानचे सरकार अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झालेली असून आपल्या जाचक आणि मानवताविरोधी क्रूर कायद्यांमुळे बदनाम असलेल्या 25 वर्षानंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर तालिबानचे वर्चस्व प्रस्थापित होणार आहे. हा भारतासह जगासाठी मोठा चिंतेचा विषय राहणार आहे.भारत आणि अफगणिस्तानच्या हितसंबंधांचा शेकडो वर्षांचा इतिहास असून गेल्या वीस वर्षांमध्ये भारताने अफगाणिस्तानाच्या पुनर्वसनासाठी अब्जावधी रुपये खर्च करून अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा, शाळा बांधणी, रस्ते विकास, धरणे व इतर मोठमोठे प्रकल्प सुरू केले आहे. भारताने केलेल्या या विकासकामांबद्दल तीन दिवसांपूर्वी तालिबानच्या शाहीन नामक प्रवक्त्याने भारताचे जाहीर आभार मानले होते. मात्र येणाऱ्या काळात तालिबान भारताशी कशा पद्धतीने संबंध ठेवतो यावर सर्व काही अवलंबून राहणार आहे.

चीनचा जळफळाट म्हणाले …
ग्लोबल न्युजने केलेल्या ट्विटनुसार,”काबूलमधील पाश्चिमात्य समर्थित सरकार पाडण्यात यश मिळाल्यास तालिबानला अफगाणिस्तानचा कायदेशीर शासक म्हणून ओळखण्यास चीन तयार आहे”. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खासकरून तालिबान तथा दहशतवादविरोधी असलेल्या जागतिक देशांसह संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परीषदेत या मुद्द्यावरून चीन विरोधात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

क्रमशः या घडामोडी mediamail.in वर वाचा

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.