राजकीय

तुम्हीच “ईडी”ची चौकशी मागे लावली – एकनाथराव खडसेंचे आ.महाजनांना प्रत्युत्तर

जळगाव दि:30 कोरोनामुळे किती त्रास होतो याची मला जाणीव आहे. त्यामुळेच मी वीस दिवस बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतो. मला अशा प्रकारची नौटंकी जमत नाही. जळगाव महानगरपालिका हातातून गेल्यामुळे गिरीश महाजन त्यांना चांगलाच झटका बसलेला आहे. त्यामुळेच त्यांना ईडी वगैरे लक्षात येत आहे,” असे जोरदार प्रत्युत्तर माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी भाजप नेते गिरिश महाजन यांना दिलेले आहे.
गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वैर आता लपून राहिलेले नाही. आज 30 मार्च रोजी जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना गिरीश महाजन यांनी खडसे यांना टोला लगावला होता की, ईडीची तारीख आली की खडसे यांना कोरोना होतो, अशी खोचक टोला आ.महाजनांनी लगावला होता. त्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय गोटासह नागरिकांमध्ये अनेक चर्चांना उधाण आलेले होते.
गिरीश महाजनांच्या या वक्तव्याचा समाचार घेत खडसे यांनीसुद्धा महाजनांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
आज “टिव्ही 9मराठी” या वृत्त वाहिनीशी बोलताना खडसे यांनी महाजनांच्या जखमेवर मीठ चोळत गिरीश महाजन कोरोनामुक्त झाले त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो. मात्र जळगाव महानगरपालिकेत झालेले सत्तांतर गिरीश महाजन यांच्या चांगलेच जिव्हारी लागलेले आहे.त्यामुळे त्यांना मोठा हादरा बसलेला आहे. कदाचित त्यामुळे त्यांना ईडी वगैरे लक्षात येत आहे, असा टोला खडसे यांनी लगावलेला आहे.

तुम्हीच ईडीची चौकशी लावली – खडसे

यावेळी खडसे त्यांनी त्यांच्या असलेल्या ईडीच्या चौकशीबद्दल सुद्धा भाष्य केले. त्यांनी ईडीला भाजपकडून सूचना दिल्या जातात असे अप्रत्यक्षपणे सांगितले. ईडीची चौकशी दुसरे कोणीच लावत नसून तुम्हीच लावली आहे, ईडी लावून त्रास देण्याचे काम तुम्हीच करता त्यामुळेच तुम्हाला आता ईडी आठवत आहे, असा टोला खडसे यांनी आ.महाजनांना लगावलेला आहे.यामुळे जिल्ह्यातील दोन मोठ्या नेत्यांमधील वाकयुद्ध चांगलेच चर्चेचा विषय बनलेले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.