क्राईम

“तो” चाळेबाज वार्डबाॕय अखेर कार्यमुक्त! जिल्हा शल्य चिकित्सक डाॕ एन एस चव्हाण यांची कारवाई

जामनेर – येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शासकीय निवासस्थानात अनैतिक कृत्य करताना काल एका प्रेमीयुगलास परिसरातील नागरिकांनी रंगेहाथ पकडलेले होते. याबाबत जामनेर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडालेली होती.
Covid-19 च्या प्रादुर्भावामुळे एका कंत्राटी वार्डबॉयला शासकीय निवासस्थान राहावयास देण्यात आलेले होते,मात्र सदरचा कर्मचारी हा बाहेरील स्त्री-पुरुषांना आपले शासकीय निवासस्थान अनैतिक कृत्य करण्यासाठी वापरण्यास देत होता. याची कुजबुज परिसरातील नागरिकांना लागलेली होती. अखेर काल सकाळी शेजारी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडून ते प्रेमीयुगल व सदरील कंत्राटी वार्डबाॕयला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले होते. त्यांचे विरोधात कलम 112 व 117 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनय सोनवणे यांनी दिलेल्या डाॕ एन एस चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक , जळगाव यांचेकडे संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याचे पत्र दिलेले होते.
याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डाॕ एन एस चव्हाण यांनी सदरील गैरकृत्याची तात्काळ दखल घेऊन आलेल्या तक्रार अर्जानुसार चौकशी करून रविशंकर चव्हाण हा कक्षसेवक यात दोषी आढळल्याने त्याला कार्यमुक्त करण्याचे आदेश दिलेले आहेत. या कार्यमुक्तीच्या धडाकेबाज कारवाईने जिल्हा शल्य चिकित्सक डाॕ एन एस चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.