वृत्तविशेष

थरारक!आत्महत्येसाठी तरूणी पटरीवर झोपली, मालगाडी वेगाने आली, तरुणानेही उडी मारली पुढे… बघा हा व्हिडिओ

भोपाळ : प्रचंड धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. एका तरुणीने आत्महत्येच्या उद्देशाने वेगाने येत असलेल्या मालगाडीच्या समोर उडी मारली. समोर अतिशय वेगाने मालगाडी येत होती. मात्र एका तरुणाने प्रसंगावधान दाखवत या तरुणीला मागे ओढले. तरुणाने तिला मागे ओढल्यामुळे ते दोघेही रेल्वे रूळामध्ये अडकले आणि ही मालगाडी त्यांच्यावरून गेली. या घटनेमध्ये दोघांचे देखील प्राण वाचले आहे. या आत्महत्या करण्यासाठी उडी मारणाऱ्या तरुणीला वाचवणाऱ्या तरुणाचे नाव मेहबूब आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, भोपाळमधील बरखेडी परिसरातील रेल्वे फाटका जवळ एक तरुणी उभी होती. याचदरम्यान एक मालगाडी अतिशय वेगाने समोर येत होती. आत्महत्येच्या उद्देशाने या तरुणीने या मालगाडीसमोर उडी मारली. मात्र ही घटना तेथे उभा असलेल्या तरुणाच्या लक्षात आली. त्याने स्व:ताच्या जीवाची परवा न करता तो या तरुणीकडे झेपावला दोघेही रेल्वे रुळाच्यामध्ये अडकले. त्यांच्यावरून रेल्वे गेली या घटनेत हे दोघेही थोडक्यात बचावली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.