वृत्तविशेष

थेट जेसीबीत व हूकमध्ये लटकून पत्रकारांचे कव्हरेज,व्हिडीओ प्रचंड व्हायरल

नवी दिल्ली दि :20 सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा काही नेम नाही. अलीकडे युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचं रिपोर्टिंग करत असताना एका महिला पत्रकाराचा उडी मारतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा प्रकार थांबत नाही तेच उत्तर प्रदेशमध्ये एका जेसीबी मशीनवर महिला पत्रकाराचा व्हिडीओ समोर आला आहे. गंमत म्हणजे, कॅमेरामॅन जेसीबीच्या मशीनच्या माती ओढण्याच्या हूकमध्ये बसलेला आहे. यामुळे देशभर या अनोख्या रिपोर्टींगची जोरदार चर्चा होतोय.एखाद्या घटनेचं रिपोर्टिंग करत असताना घटनास्थळाची संपूर्ण माहिती हे प्रेक्षकाला मिळावी यासाठी पत्रकार सदैव हुशारीने प्रयत्न करत असतो. पण,काही जण हास्यास्पद रिपोर्टींग करून स्वत:चं हसू तर करून घेतातच आणि पत्रकारिता क्षेत्राचेही नाव बदनाम करतात.
उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने अनधिकृतरित बांधकामावर कारवाईचा धडाका लावला आहे. अशाच एका ठिकाणी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येत होती. यावेळी एक पत्रकार महिला आपल्या कॅमेरामॅन सोबत पोहोचली. ही महिला थेट जेसीबी मशीनवर चढली आणि चालकाच्या शेजारी बसली.धक्कादायक म्हणजे, कॅमेरामन हा माती ओढण्याच्या हूकमध्ये जाऊन बसला होता. हा सगळा प्रकार तिथे उपस्थितीत असलेल्या काही लोकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. कॅमेरामॅन आणि महिला पत्रकाराचा प्रताप पाहून सोशल मीडियावर एकच हशां पिकलेला आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.