क्राईम

दाऊदच्या ड्रग्ज फॕक्टरीचा NCB कडून पर्दाफाश, 2 कोटी 18 लाखांची रोकड जप्त

मुंबई दि-21ः बाॕलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणापासून सुरू झालेली नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)ची धडक कारवाई अजूनही सुरूच असून काल एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतल्या डोंगरी भागात सुरु असलेल्या ड्रग्ज बनवणाऱ्या फॅक्टरीचा पर्दाफाश केलेला आहे. डोंगरी हा दाऊदच्या हस्तकांचे वर्चस्व असणारा परीसर म्हणून कुख्यात आहे. यामुळे महाराष्ट्र आणि भारतात अंमली पदार्थ विकणार्‍या टोळीचे कंबरडे मोडण्यात एनसीबीच्या पथकाला यश आलेले आहे.
मुंबईत आतापर्यंत छोट्या-मोठ्या ड्रग पेडलर्ससला अटक करणाऱ्या एनसीबीने काल दाऊदशी थेट संबंध असणाऱ्या आरिफ भुजवाला या मोठ्या ड्रग माफियाच्या घरात घुसून कारवाई केलेली आहे. त्याच्या घरात दहा ते बारा किलो वेगवेगळ्या ड्रग्जसोबत ड्रग्स बनवणारी एक फॅक्टरी देखील सापडली आहे. एनसीबीने कारवाई केलेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा मासा असल्याचे एनसीबीचे अधिकारी सांगत आहे. आरिफ हा डोंगरी भागात नूर मंजिल नावाच्या इमारतीत राहत होता.


ही फक्टरी चालवण्यामागे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम आणि कुख्यात तस्कर कैलास राजपूत असल्याचे समोर आले आहे. आरिफच्या घरी तब्बल 2 कोटी 18 लाख रुपयांची रोकड देखील एनसीबीला सापडली आहे. ही फॅक्टरी चालवणारा सराईत आरोपी आरिफ भुजवाला हा सध्या फरार आहे. त्याला पकडण्यासाठी NCB ने लूक आऊट नोटीस जारी केली आहे, असे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितले की, मुंबई, महाराष्ट्रात आणि भारतात आरिफ हा सर्वात मोठ ड्रग्ज डिलर असून हा ड्रग्ज माफिया कैलास राजपूत गँगसाठी काम करत होता. त्यामुळेच आरिफवर झालेली कारवाई ही सर्वात मोठी मानली जात असून यामुळे आणखी अनेक मोठे मासे हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.