क्राईम

दिड लाखांची लाच घेताना कार्यालय अधिक्षक ACB च्या जाळ्यात

एरंडोल :- येथील म्हसावद नाका परिसरातील असलेल्या व्यापारी संकुल वरील जागेच्या पुढील नुतनीकरण करून देतो,व सील केलेले गाळे लिलावमध्ये ताब्यात देतो व इतर गाळ्याना नगरपालिकेतर्फे नोटीस न देण्यासाठी 2 लाख रुपयांची मागणी करण्यात आली यामध्ये तडजोडी अंती दीड लाख रुपये स्वीकारतांना नगरपालिका कार्यालय अधीक्षक संजय दगडू ढमाळ वय 51 वर्षे राहणार 24 म्हाडा कॉलनी अमळनेर जिल्हा जळगाव यास धुळे येथील A C B पथकाचे प्रमुख सुनील कुराडे पोलीस उपाधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली दीड लाख रुपयांची लाच घेताना आरोपी संजय ढमाळ यास रंगेहाथ पकडण्यात आले. त्यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख हे नगरपालिका कार्यालयातून फरार झाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे म्हसावद नाका व्यापारी संकुलच्या वरती गाळे आहेत या गाड्यांची मुदत संपली म्हणून नगरपालिकेने तक्रारदार यांच्या पत्नीला नोटीस देऊन गाळे सील करण्यात आले होते. त्यामुळे तक्रारदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागितली होती तेथे जिल्हाधिकारी यांनी तक्रारदार यांचेकडून निकाल दिला होता. म्हणून नगरपालिकेने या निकालाच्या विरोधात मध्ये आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. या ठिकाणी आयुक्त यांनी नगरपालिकेचा भरणा करून गाळे पुन्हा परत त्यांना देण्यात यावे असे सांगितले. तक्रारदार वारंवार नगरपालिकेत जाऊन आपण लावलेल्या गाड्यांना सील काढून घेण्यात यावे याकरिता विनंती करू लागला त्यावेळेस आरोपी यांनी सांगितले की तुम्हाला नोटीस फी सील केलेल्या गाड्यांची फी ही नगरपालिकेत भरावी लागेल किंवा आम्हाला याची फी द्यावी लागेल असे सांगितले तक्रारदार हे पहिल्यांदा एक लाख रुपये घेऊन त्या ठिकाणी गेले होते परंतु एवढ्या पैशांमध्ये तुमचे काम होणार नाही असे आरोपींनी सांगितले व अपमानित करून त्यांना घरी जाण्यासाठी सांगितले. म्हणून तक्रारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालया पोहचून झालेली सर्व हकीकत सांगितली. पथकाचे प्रमुख सुनील कुराडे पोलीस उपाधीक्षक व त्याचे सहकारी एरंडोल येथे येण्याच्या दहा किलोमीटर आधी दीड लाख रुपयाच्या नोटांना पावडर लावून तक्रारदार यांच्या शर्टास गुप्त कॅमेरा लावून त्यांना
नगरपालिकेत कार्यालय अधीक्षक यांच्या चेंबरमध्ये पाठवण्यात आले व पथक मध्ये आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी हे ठीकठिकाणी उभे राहिले व तक्रारदार यांनी सांगितल्याप्रमाणे डोक्याला हात लावला व पथकातील कर्मचाऱ्यांनी रंगेहात आरोपी यास दीड लाख रुपये लाच घेताना रंगेहात पकडले.
याठिकाणी आरोपीकडून एक लहान कागदाची चिठ्ठीज्यावर रुपये लिहिलेले होते असे हस्तगत करण्यात आले.
एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच एरंडोल पालिकेच्या वर्तुळातील लाचखोरांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे . दरम्यान , संशयीताने एवढ्या मोठ्या प्रमाणावरील लाच कुणाच्या सांगितल्यावरून मागितली याचा उलगडा एसीबीच्या खोलवर चौकशीत होणार आहे . या प्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.
दिड लाखांची लाच भोवली
एरंडोल शहरातील 51 वर्षीय तक्रारदाराने धुळे एसीबीकडे या संदर्भात 12 रोजी तक्रार नोंदवली होती यामध्ये मुख्याधिकारी किरण देशमुख व आरोपी पालिका कार्यालय अधीक्षक संजय दगडू धमाळ यांनी तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या नगरपालिका दुकान संकुलातील करार संपल्याने सील केलेले गाळे लिलावामध्ये ताब्यात देऊन तसेच तक्रारदार यांच्या इतर गाळ्याना नोटीस न देण्यासाठी 12 मार्च रोजी दोन लाखांची लाच मागितली मात्र दिड लाखात तडजोड झाली . एसीबीने सापळा रचल्यानंतर आरोपीने शुक्रवारी दुपारी दिड लाखांची लाच पालिकेत स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली तर पालिकेत यानंतर मोठी खळबळ उडाली . यांनी केला सापळा यशस्वी हा सापळा धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण व प्रकाश झोडगे , सुधीर सोनवणे , संतोष हिरे , कृष्णकांत वाडीले , प्रशांत चौधरी , राजन कदम , सुधीर मोरे यांच्या पथकाने यशस्वी केला .

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.