कायदे

दिवाळीसाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

जळगाव – कोव्हिड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा दिपावली उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत :
१)राज्यात तसेच मोठ्या शहरामध्ये अद्यापही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत .चालू वर्षी कोविड या संसर्गजन्य रोगाचा झालेला प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या सात आठ महिन्यात आलेले सर्व धर्मीय सण / उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत .या वर्षीचा दिपावली उत्सव को बेड कालावधीत साजऱ्या केलेल्या अन्य उत्सवांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करावा.
२)कोविंड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे अद्याप खुली करण्यात आलेली नाहीत .त्यामुळे साजरा केला जाणारा दिपावली उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी .उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे .तसेच नागरिकांनी गर्दी टाळावी व मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये , मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे , जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग / संक्रमण वाढणार नाही.३)दिपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो .या उत्सवा दरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते .त्यामुळे वायु व ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दिपावली उत्सवानंतर बराच कालावधीपर्यंत दिसून येतात .कोरोना आजारामुळे परिणाम झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायु प्रदुषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भीती आहे .ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी चालू वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे , त्याचा त्रास होऊ शकतो .त्याऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणावर करुन उत्सव साजरा करावा .या उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उपक्रम / कार्यक्रम उदा .दिपावली पहाट आयोजित करण्यात येऊ नयेत .आयोजित करावयाचे झाल्यास online , केबल नेटवर्क , फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे त्याचे प्रसारण करावे .सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम / शिबीरे ( उदा . रक्तदान ) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना .मलेरिया , डेंग्यू इ.आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी .मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊ नये , याची दक्षता घेण्यात यावी .६)कोविड- १ ९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन , आरोग्य , पर्यावरण , वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका , पोलीस , स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील .तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे .

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.