स्थानिक प्रशासन निर्णय

दीपनगर वीजनिर्मीती संच पुन्हा सुरू – मुख्य कार्यकारी अभियंता प्रकाश खंडारे

भुसावळ दि-3 दीपनगर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील बंद संच २१ दिवसांनी पुन्हा कार्यान्वित करण्यात आलेला असून यातून एक हजार मेगावॅट वीज निर्मिती होणार असल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अभियंता श्री प्रकाश खंडारे यांनी दिलेली आहे.
संपूर्ण राज्यासह देशात वीजेची मागणी घसरल्याने दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील विजनिर्मिती ठप्प होती. दरम्यान मागणी वाढल्याने २१ दिवसांनी केंद्रातील ५०० मेगावॅट स्थापित क्षमतेचे दोन्ही वीजनिर्मिती संच कार्यान्वित करण्यात आलेले आहे.

दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील २१० मेगावॅटचा संच क्रमाक तीन हा वीज मागणी कमी झाल्याने ८ जून रोजी बंद करण्यात आलेला होता. तर ५०० मेगावॅटचे दोन्ही संच ११ जून रोजी बंद करण्यात आले होते. राज्याची विजेची मागणी घटली, तसेच दीपनगर केद्रातून निर्मित होणाऱ्या वीजेपेक्षा खासगी क्षेत्रातील वीजेचे मुल्य कमी होते. यामुळे एमओडी अर्थात मेरीट ऑर्डर डिस्पॅचनुसार दीपनगरचे संच बंद करण्यात आले होते. यावेळी कोरोनाचे काही निर्बंध असल्यानेही विजेची मागणी कमी होती. मात्र आता मागणी पून्हा वाढत आहे.
राज्यात महावितरणची वीजमागणी १५ ते १७ हजार ५०० मेगावॅट आहे, तर देशात १९ हजार ९०० मेगावॅट वीजेची मागणी आहे. यामुळे दीपनगरातील ५०० मेगावॅट स्थापित क्षमतेचे संच २१ दिवसांनी लाईटअप करण्यात आले. सायंकाळी यातून विजेची निर्मिती सुरु झाली.

२.८९ पैसे युनिट मुल्य
दीपनगर औष्णिक केद्रातून निर्मिती विजेचे मुल्य मे महिन्यात २ रुपये ८९ पैसे आहे. कोळशाची हाताळणी व वाहतूकीमुळे हे मुल्य व अन्य खर्चांवर हे मुल्य ठरते. कोळसा खाणींच्या क्षेत्रात असलेल्या विजेचे मुल्य हाताळणी व वाहतूक खर्च कमी असल्याने तेथील मुल्य कमी राहते. यामुळे हे संच कार्यान्वित राहतात.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.