क्राईम

दुचाकी चोरून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 20 दुचाकी जप्त,6 जणांना अटक

धरणगाव- धरणगाव पोलिसांनी आज चोरीच्या 20 दुचाकींसह 6 जणांना अटक केलेली आहे. या कारवाईमुळे चोरीच्या दुचाकी खरेदी विक्री करणा-यांमध्ये मोठी खळबळ माजलेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,धरणगाव तालुक्यातील बोरगाव परिसरात एकाच क्रमांकाच्या दोन मोटारसायकल एका व्यक्तीकडे असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना खब-याकडून समजली होती. त्यानुसार त्यांनी आपले सहकारी पोलिस उपनिरिक्षक अमोल गुंजाळ, पो.हे.काँ. खुशाल पाटील, पो.ना. मोती पवार, पो.काँ. दिपक पाटील, पो.ना. गजेंद्र पाटील, पो.ना. वसंत कोळी यांना तपासकामी रवाना केलेले होते. संबंधीत मोटार सायकल धारकाकडे जावून चौकशी करून खात्री केली असता त्याच्या ताब्यात एकाच क्रमांकाच्या दोन मोटारसायकल आढळून आल्या. त्याच्याकडून अधिक माहिती घेतली असता त्याने भुषण विजय पाटील (रा. पळासखेडा सिम ता. पारोळा) यांचेकडुन मोटरसायकल खरेदी केल्याचे त्याने सांगितले.या चौकशीत भुषण पाटील याने अनेकांना चोरीच्या जुन्या मोटारसायकली विकल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
त्यानुसार भुषण विजय पाटील यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून भुषण धनराज पाटील व अमोल नाना पाटील (दोघे रा. शनी मंदीर,पारोळा ) या दोघा मोटार सायकल चोरांची नावे पुढे आली. दोघांना ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. भुषण पाटील व अमोल पाटील यांनी गेल्या दिड वर्षात अनुक्रमे ९ आणि २ मोटारसायकलची चोरी केल्याचे व त्या दहा हजारात विक्री केल्याचे उघड झाले. या सर्व मोटारसायकल त्यांनी चिंचपुरा, चोपडा, चाळीसगाव, मालेगाव, धुळे, शिरपूर अशा विविधा गावातून चोरी केलेल्या आहेत. चोरीच्या मोटारसायकली त्यांनी भुषण विजय पाटील पळासखेडासिम ता. पारोळा, जयेश रविंद्र चव्हाण रा. जवखेडा ता. अमळनेर, ज्ञानेश्वर राजेंद्र धनगर रा. वर्डी ता.चोपडा, पंकज मधुकर खजुरे रा. राजु नगर पारोळा यांच्या माध्यमातून विक्री केलेल्या आहेत.
अशा प्रकारे सर्व सहा जणांना ताब्यात घेत सखोल तपासाअंती विस मोटार सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत. धरणगाव पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या संदर्भातील गु.र.न. ५६६/२० या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आलेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.