नागपूरनिवडणूकमुंबईराजकीयविदर्भ

देवेंद्र फडणवीसांच्या नव्या मंत्रिमंडळात “यांना” संधी मिळण्याची शक्यता ,यादी आली समोर

देवेंद्र फडणवीसांच्या नव्या मंत्रिमंडळात “यांना” संधी मिळण्याची शक्यता ,यादी आली समोर

देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळ कशा प्रकारचं असेल, याबाबत चर्चा सुरु आहेत. यासंदर्भात संभाव्य यादी ‘मिडियामेल न्युज’च्या हाती आलेली आहे.
शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळं महाविकास आघाडी सरकार काल अडीच वर्षांनंतर कोसळलं.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाच्या सोबतच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. तर दुसरीकडे उद्या देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीची शक्यता आहे. आज भाजप राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री पदासाठी इच्छुक असलेल्यांना सबुरा सल्ला दिलेला आहे. त्यामुळे त्यांचं मंत्रिमंडळ कशा प्रकारचं असेल, कोणकोणाला संधी मिळेल याबाबत चर्चा सुरु आहेत. यासंदर्भात संभाव्य यादी समोर आलेली आहे.
कॅबिनेट
देवेंद्र फडणवीस
चंद्रकात पाटील
सुधीर मुनगंटीवार
गिरीश महाजन
आशिष शेलार
प्रवीण दरेकर

प्रसाद लाड
रवींद्र चव्हाण
चंद्रशेखर बावनकुळे

विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख
गणेश नाईक
राधाकृष्ण विखे पाटील

संभाजी पाटील निलंगेकर
राणा जगजितसिंह पाटील
संजय कुटे

डॉ. अशोक उईके/ विजयकुमार गावित
सुरेश खाडे
जयकुमार रावल
अतुल सावे

देवयानी फरांदे
रणधीर सावरकर
जयकुमार गोरे

विनय कोरे, जनसुराज्य
परिणय फुके
राम शिंदे किंवा गोपिचंद पडळकर

हे राज्यमंत्री होण्याची शक्यता
नितेश राणे
प्रशांत ठाकूर
मदन येरावार
महेश लांडगे
निलय नाईक
गोपीचंद पडळकर

महामंडळ अध्यक्षपद

संजय सावकारे
राम सातपुते

शिंदे गटाकडून यांची नावे चर्चेत

कॅबिनेट मंत्री

एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्रीपदासह)
गुलाबराव पाटील
उदय सामंत
दादा भुसे
अब्दुल सत्तार
शंभूराज देसाई
बच्चू कडू
तानाजी सावंत
दीपक केसरकर

राज्यमंत्री
संदीपान भुमरे
संजय शिरसाट
भरत गोगावले

भाजपच्या विधिमंडळ पक्षाची महत्वपूर्ण बैठक सुरू

भाजपच्या विधिमंडळ पक्षाची आता महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत पुढील रणनीती ठरवणार आहे. आज भाजपचा विधिमंडळ पक्षनेता निवडला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर उद्या सत्तास्थापनेचा दावा करत देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. काल उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांना पेढे भरवून भाजपनं जोरदार जल्लोष केला. बहुमत चाचणीसंदर्भात सुप्रीम कोर्टानं मविआला धक्का दिला आणि बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. मात्र त्याआधीच काल रात्री फेसबुक लाईव्हद्वारे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानं सरकार कोसळलेलं आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.