खान्देशजळगावनिवडणूकराजकीय

देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा जलवा, तर आ.गिरीश महाजन “ग्राऊंड लेव्हलचे” सूत्रधार,भाजपच्या विजयाची रणनीती वाचा

देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा जलवा, तर आ.गिरीश महाजन “ग्राऊंड लेव्हलचे” सूत्रधार,भाजपच्या विजयाची रणनीती वाचा

मुंबई :- राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून महाविकास आघाडीतील पक्षांनी विशेष काळजी घेतली होती.आपापल्या पक्षाच्या आमदारांना फाईव्हस्टार हॉटेलमध्ये राहण्याच्या सोयीपासून मतदान कसं करायचं ? इथपर्यंतची तालीम आमदारांना देण्यात आली होती. असे असतानाही आघाडीची एकदोन नाही तर तब्बल 21 मतं फुटली आहे.तसेच अपक्षांनी याही वेळी भाजपच्या उमेद्वारांसाठी मतदान केल्याचा संशय महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही देवेंद्र फडणवीस यांचा जलवा बघायला मिळालेला आहे. या निवडणुकीत भाजपचे प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे पाचही उमेदवार विजयी झालेले आहेत.
गिरीश महाजन “ग्राऊंड लेव्हलचे” सूत्रधार ?
प्रसाद लाड यांच्या विजयासाठी भाजपकडे 15 मते कमी होती. पुरेसे संख्याबळ भाजपकडे नसतानाही प्रसाद लाड यांचा विजय झालेला आहे. मात्र या सर्व घडामोडीं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून आमदार गिरीश महाजन यांनीच ग्राऊंड लेव्हलला सूत्रे हलविण्याची जबाबदारी पार पाडल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.
दरम्यान, भाजपाने राज्यसभा निवडणुकीत पाठोपाठ आता विधान परिषदेच्या निवडणुकीत पाचवा उमेदवार उभा करून अशक्यप्राय वाटणारा विजय शक्य करून सर्वांना धक्का दिलेला आहे. या दोन्ही निवडणुकांमध्ये अपक्षांना गळाला लावण्याचे काम पडद्यामागे भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.
जळगाव जिल्ह्यातील भाजपचे नेते आमदार गिरीश महाजन यांच्यावर राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी छोटे पक्ष,अपक्ष आमदारांच्या मतांच्या बेरजेसाठी त्या अपक्ष आमदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांना भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांना मतदान करण्यासाठीची जबाबदारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली होती. ही जबाबदारी आमदार गिरीश महाजन यांनी यशस्वीरित्या पार पाडत गेल्या राज्यसभा निवडणुकीत पुरेशी मतसंख्या नसतानाही शिवसेनेचे उमेद्वार संजय पवार यांचा धक्कादायक पराभव करत धनंजय महाडिक यांना विजयी करून चमत्कार घडवून आणला होता. तोच कित्ता आताही गिरवत फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्यावर विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड यांच्या विजयासाठी पुन्हा त्याच अपक्ष आमदारांसह इतर पक्षातील आमदारांना गळाला लावण्यासाठी खास व्यूहरचना आखलेली होती आणि ती यशस्वी सुद्धा झाल्याचे आजच्या विधानपरिषदेच्या निकालावरून स्पष्टपणे दिसून येत आहे.
महाविकास आघाडीसाठी प्रचंड धक्कादायक ठरलेल्या दोन्ही निवडणूकामधील अनपेक्षित पराभवास फडणवीसांची चाणाक्यनीती कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे.या विजयामुळे भाजपमध्ये आता देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर गिरीश महाजन हे राज्यातील भाजपचे नंबर 2 चे नेते म्हणून उदयास आल्याचे आता सिद्ध होत आहे. भाजपने राज्यसभा निवडणुकीपेक्षा आणखी १० जास्त मतं फोडून महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. भाजपला पहिल्या पसंतीची एकूण १३३ मतं मिळाली आहेत. शिवसेनेच्या एकूण ५५ मतांच्या कोट्यांपैकी फक्त ५२ मते त्यांना मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनेची तीन मतं फुटल्याचे सांगितले जात आहे.तसेच शिवसेना समर्थक 8 अपक्ष आमदारांची मते कुठे गेली यावरही शिवसेनेच्या गोटात चर्चा सुरू आहेत.तर काँग्रेसकडे एकूण ४४ आमदार होते. मात्र, काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना मिळून एकूण ४१ मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यांचीही तीन मतं फुटल्याचे निष्पन्न झाले आहे.या सर्व फुटलेल्या मतांची रणनीती ही गिरीश महाजन यांनीच घडवून आणल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. यापुढे भारतीय जनता पक्ष आमदार गिरीश महाजन यांच्यावर आणखी मोठी पक्षाची जबाबदारी देण्याची शक्यता भाजपच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आजच्या अशक्यप्राय विजयामुळेआमदार गिरीश महाजन यांचा आत्मविश्वास वाढलेला असून त्यांचे पक्षातील पक्षातील स्थान आणखी मजबूत झालेले आहे. आता याच अपक्ष ,छोटे पक्ष व इतर पक्षातील आमदारांना गळाला लावून फडणवीस राज्यात सत्तांतर घडविण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.
आज झालेल्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे, शिवसेनेचे आमशा पाडवी, काँग्रेसचे भाई जगताप शिवसेनेचे सचिन अहिर हे पाच उमेदवार विजयी झाले असून काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांना मात्र अपयशाला सामोरं जावं लागलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमने हा चमत्कार घडवून आणल्याचं म्हटलं जात आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.