निवडणूकमुंबईराजकीय

देवेंद्र फडणवीस राजभवनात दाखल, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता ?

देवेंद्र फडणवीस पत्ते खोलण्याच्या तयारीत

देवेंद्र फडणवीस राजभवनात दाखल, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता ?

मुंबई- राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत स्पष्टपणे दिसू लागलेले असून राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असे आताच राजभवनात दाखल झालेले आहे. ते राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार हे अल्पमतात आल्याचा दावा ते करू शकतात. तसेच त्यासाठी हस्तक्षेप करून ‘फ्लोअर टेस्ट’ घेण्याची मागणीही देवेंद्र फडणवीस करण्याची मोठी शक्यता वर्तविण्यात येत आहे.यामुळे आता राजकीय घडामोडींना तुफान वेग आलेला असून महा विकास आघाडीचे सरकार धोक्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. आतापर्यंत भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे फक्त बैठकांवर बैठका घेऊन आणी वारंवार दिल्ली दरबारी जाऊन सत्तेचे डावपेच आखण्यात मग्न होते. तसेच ते माध्यमांपासूनही दूर राहून मौन बाळगून होते.कालच मुंबईतील त्यांच्या सागर बंगल्यावर महाराष्ट्र भाजपची कोअर कमिटीची बैठक झालेली होती.तरीही ते मौन बाळगून सर्व राजकीय परीस्थिती वर बारीक लक्ष ठेवून होते.मात्र आता त्यांनी दोन्ही पाऊलं पुढे टाकलेली असून त्यांच्या कृती व निर्णयांकडे महाराष्ट्रासह अख्ख्या देशाचे लक्ष लागून आहे. त्यांनी आता प्रत्यक्ष जोरदार हालचाली सुरू केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्तांतराचे संकेत दिसू लागले आहे.
दरम्यान, दुसरीकडे गुवाहाटीत असलेले एकनाथ शिंदे गटाचे काही अपक्ष आमदार उद्या मुंबईत येणार असून ते राजभवनात राज्यपाल यांची भेट घेऊन महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे झाल्यास महा विकास आघाडीचे सरकार कोसळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आता राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमकी काय चर्चा होते.यानंतर पुढे नेमक्या काय घडामोडी सुरू होतात हे पाहणे आता खूप महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यपाल नेमके काय निर्णय घेतात याकडे सर्व सत्ताधारी महा विकास आघाडीचे लक्ष लागून आहे. आता राज्यपालांच्या हालचालींवर महा विकास आघाडीचे भवितव्य अवलंबून असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.