राष्ट्रीयवृत्तविशेषशासन निर्णय

देशातील उच्च न्यायालयांमध्ये “या” मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती, राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संभाजी शिवाजी शिंदे यांची नियुक्ती

देशातील उच्च न्यायालयांमध्ये “या” मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती, राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संभाजी शिवाजी शिंदे यांची नियुक्ती

भारतीय राज्यघटनेच्या कलम 217 आणि 222 च्या खंड (1) द्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, भारताचे राष्ट्रपती, माननीय सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर, खालील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती/बदली करण्याची अधिसूचना जारी केलेली आहे. खालील रकान्यांमध्ये सहा न्यायमूर्तींची नावे व त्यांच्या समोर त्यांच्या बदलीची नियुक्तीची ठिकाणी दिलेली आहे.
दरम्यान , राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संभाजी शिवाजी शिंदे यांची नियुक्ती
राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती संभाजी शिवाजी शिंदे यांची नियुक्ती केंद्र सरकारने अधिसूचित केलेली आहे. ते सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांचा दोन महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. न्यायमूर्ती शिंदे हे छत्रपती घराण्याचे राजवंशज आहे. न्यायमूर्ती शिंदे यांची नुकतीच सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सरन्यायाधीशपदी बढतीसाठी शिफारस केली होती. मात्र ते शर्यतीतून मागे पडले.

“हे” खास गाजलेली प्रकरणे

न्यायमूर्ती शिंदे यांनी अलीकडच्या काळात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा खटला,भीमा कोरेगाव-एल्गार परिषद खटला, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्यावरील खटल्यांसह विविध हायप्रोफाइल प्रकरणांचे अध्यक्षपद भूषवले आहे. काही दिवसांपूर्वी, ते ठळकपणे चर्चेत आले होते, कारण त्यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ 9 जून 2022 रोजी रात्री 8.30 वाजेपर्यंत विविध फौजदारी खटल्याची सुनावणी करत होते. यापूर्वी सूचीबद्ध केलेल्या 265 पैकी 215 प्रकरणांवर सुनावणी झाली. 8 जून 2022 रोजी याच खंडपीठाने 190 प्रकरणांची सुनावणी केली होती.

Source by Department of Justice (Appointments Division), Ministry of Law & Justice
Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.