मंत्रीमंडळ निर्णय

देशातील मोठ्या प्रकल्पांच्या निधीसाठी नॕशनल बँक स्थापन होणार- निर्मला सितारमण केंद्रीय अर्थमंत्री

नवीदिल्ली दिः16- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी केंद्रीय कॅबिनेटची बैठक झाली. या बैठकीत नॅशनल बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोठ्या पायाभूत आणि मूलभूत सोयीसुविधांच्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी ही बँक काम करणार आहे. या बँकेला विकास वित्त संस्था असे नाव देण्यात आले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात अशी बँक स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्याला आता कॅबिनेटने मंजुरी दिल्याची माहिती सीतारमण यांनी आज दिलेली आहे. देशातील प्रमुख मोठ्या पायाभूत प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्याचे काम वित्तीय विकास संस्था करणार आहे. या बँकेसाठी एक बोर्ड स्थापन करण्यात येणार आहे. ते बोर्ड पुढील निर्णय घेणार आहे. सरकारकडून सुरुवातीला 20 हजार कोटींचा निधी यासाठी देण्यात येणार आहे. भविष्यात या बँकेकडून रोखे जारी करण्यात येऊन यात गुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. आगामी काही वर्षांमध्ये 3 लाख कोटींचा निधी उभारण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलेले आहे. यात गुंतवणूक करणाऱ्यांना कर सवलतही देण्यात येणार आहे. यात मोठे सॉवरेन फंड, पेन्शन फंड गुंतवणूक करू शकतात. अशी प्राथमिक माहिती देण्यात आलेली आहे.

अलिकडच्या काळात कोणतीही जुनी बँक मोठ्या प्रकल्पांसाठी निधी देण्यास तयार होत नव्हती. सपमारे 6 हजार ग्रीन ब्राऊन फिल्ड प्रोजेक्टला निधीची गरज आहे. त्यामुळे यासाठी नॅशनल बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.या नॕशनल बँकेच्या सदस्य मंडळावर विविध क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांचा समावेश करण्यात येणार आहे.

देशातील सर्वच सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण होणार नाही- निर्मला सितारमण अर्थमंत्री

आज देशातील बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी खाजगीकरणाविरोधात दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर, देशातील सर्वच बँकांचे खासगीकरण करण्यात येणार नसल्याचे निर्मला सीतारमण यांनी आज स्पष्ट केलेले आहे. देशात स्टेट बँक आॕफ इंडिया सारख्या बँका कायम असायलाच हव्यात असेही सितारमण यांनी सांगितले. बाजारातील गरजा पूर्ण करण्यासाठी ही वित्तीय विकास संस्था स्थापन करण्यात येणार आहे. ज्या बँकांचे खासगीकरण होत आहे, त्यातील कर्मचाऱ्यांचे अधिकार आणि भविष्य याबाबत काळजी घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज स्पष्ट केलेले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.