रेल्वे संबंधी
देशातील सर्वात सुंदर व अत्याधुनिक रेल्वे स्टेशनचे आज झाले लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून येथील सर्व सहा रेल्वे गाड्यांना हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केलेले आहे. गुजरातचे केवडिया रेल्वे स्थानक हे देशातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानक बनले आहे. पुनर्निर्माणानंतर केवडिया रेल्वे स्थानक आता विमानतळासारखे अत्याधुनिक दिसू लागलेले आहे. विशेष म्हणजे हे केवडिया रेल्वे स्टेशन ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेट प्राप्त झालेले भारतातील पहिले एकमेव रेल्वे स्टेशन आहे.


