वृत्तविशेष

देशातील 4 लाख 70 हजार आधार कार्ड रद्द,UIDAI चा निर्णय

मुंबई- महाराष्ट्रातील तब्बल 19 लाख विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बोगस असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सेवानिवृत्त न्यायाधीशांचा समावेश असलेली तीन सदस्यांची समिती नियुक्त करण्याचा आदेश दिलेला आहे. त्यात इतर 2 सदस्य हे सॉफ्टवेअर अभियंता आणि एक जेष्ठ वकील असणार आहेत.
आधार सिस्टीम कमकुवत -कॅग (CAG)
आधार सिस्टिमचा आधारच कमकुवत असल्याचे देशातील सर्वोच्च लेखापरिक्षक संस्था कॅग ( नियंत्रक व महालेखापरीक्षक) स्पष्ट केलेले असून या यंत्रणेतील अनेक त्रुटींवर बोट ठेवलेले आहे.यासंदर्भात नुकताच कॅग 108 पानी अहवाल जाहीर केला असून त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे की ,युआयडीएआय (युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया) चे लेखापरीक्षण करून अनेक त्रुटी व समस्या उघडकीस आणलेल्या आहेत.आधार कार्ड तयार करण्याची प्रक्रिया आणि डेटा मॅनेजमेंटच्या अनेक त्रुटींवर बोट ठेवलेले आहे. व या संदर्भात काही मुद्दे उपस्थित केले आहे. यूआयडीएआय आधार कार्ड तयार करणारी आणि संबंधित सेवा देणारी केंद्रीय सरकारी संस्था आहेत. युआयडीएआयला डुप्लिकेशन मुळे चार लाख 70 हजार आधार कार्ड रद्द करावी लागलेली आहे. आधार कार्ड यातील डेटा मजकूर व माहिती संग्रहण व्यवस्थेतील त्रुटी व समस्या त्यांनी उघडकीस आणलेले आहेत. त्यात लोकांच्या खाजगी माहिती (प्रायव्हसी)चा मुद्दा देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे. कॅगने असेही स्पष्ट केलेले आहेत की,UIDAI जगातील सर्वात मोठी डेटाबेस मेंटेन करीत आहे,पण त्यांच्याकडे संग्रहण प्रणालीचे धोरणच नाही,आणि ही सिस्टीम अत्यंत आवश्यक आहे.
बँक मोबाईल ऑपरेटर्सना नियमबाह्य सेवा उपलब्ध
युआयडीएआय (UIDAI) मार्च 2019 पर्यंत बँक मोबाईल ऑपरेटर्स आणि इतर एजन्सीला मोफत प्रमाणन व पडताळणी सेवेची परवानगी उपलब्ध करून दिली होती, ते या संस्थेच्या तरतुदी विरोधात आहे.या संस्थेच्या पडताळणी साठी वापरात असलेली एप्लीकेशन किंवा इक्विपमेंट्स नागरिकांचे वैयक्तिक माहिती संग्रहित करण्यासाठी सक्षम आहे किंवा नाही याची काळजी घेतलेली दिसत नाही त्यामुळे नागरिकांची खासगी माहिती धोक्यात आलेली आहे शिवाय ठपका ठेवलेला आहे. तसेच सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बायोमॅट्रिकची गुणवत्तादेखील खराब असल्याचा ठपका कॅगने ठेवलेला आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.