क्राईम

दोन दुचाकींची भीषण धडक,दोन युवक ठार

फैजपूर- यावल तालुक्यातील अकलूद गावाजवळ फैजपूर भुसावळ मार्गावर दोन बाईकची समोरा समोर धडक झाल्याने दोन तरुण ठार झाल्याची घटना दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.घटनास्थळी फैजपूर पोलिस कर्मचारी दाखल झालेले असून दोघांना जळगाव येथील शासकीय रुग्णालयात रवाना केलेले आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की , दिनांक ३०/७/२०२१ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास फैजपूर भुसावळ मार्गावर असलेल्या अकलूद गावाजवळ मोटर सायकल चालक डबल सीट येत असतांना अचानक समोरून भरधाव वेगाने मोटरसायकल आली असता दोघांची समोरा समोर धडक . झाल्याने यावल तालुक्यातील पाडळसा येथील राजकुमार तायडे व राहुल वारुळकर यांचा अपघात झाल्याची माहिती गावातील नागरिकांनी फैजपूर पोलिसांना कळविली.त्या माहितीच्या आधारे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले असता एक तरुण जागीच ठार झाला असून दुसरा तरुण उपचारासाठी जातांना रस्त्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती घटनास्थळी पोहचलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली.दोघांना शासकीय रुग्णालय जळगांव येथे शवविच्छेदन करण्यासाठी रवाना करण्यात आले आहे .

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.