राजकीय

दोन बायकांचा लाडका “धनी”, निवडून आणल्या बायका “दोन्ही”

जिल्ह्यासह राज्यभर चर्चेचा विषय

नेहमी असे म्हटले जाते की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो परंतु या म्हणीला अपवाद ठरेल अशी एक एक अविस्मरणीय घटना सध्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पहाण गावात समोर आलेली आहे.एका जिगरबाज पतीने आपल्या पहिल्या पत्नीला ग्रामपंचायत सदस्य निवडून आणल्यानंतर गावात पोटनिवडणुकीची आलेली संधी पाहून दुसऱ्या पत्नीलाही ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून निवडून आणल्याने हा विषय जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलेला आहे. पाचोरा तालुक्यातील पाहणं या गावी समोर आली आहे. आपल्या दोन्ही पत्नी गावच्या राजकारणात निवडून आल्याने गावच्या विकासात या दोन्ही चा सहभाग होणार असल्याने खुश झालेल्या पतिराजानी आपल्या दोन्ही पत्नीचं चक्क औक्षण करून आणि त्यांना पेढा भरवून आपला आनंद व्यक्त केला आहे
विलास पाटील हे शिवसेनेचे कट्टर सैनिक राहिले आहे बाळासाहेब ठाकरे आणि मातोश्री वर त्यांचं अतोनात प्रेम असल्याने त्यांनी आपल्या घराचा नाव देखील मातोश्री ठेवलं आहे.
पहाण गावातील शिवसेना शाखा प्रमुख असलेल्या विलास पाटील यांनी आपल्या पहिल्या पत्नीला मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आणलेले होते,विलास पाटील यांचा स्वभाव आणि त्यांनी केलेली काम पाहून गावकऱ्यांनी त्यांच्या पत्नीला भरघोस मतांनी निवडून दिले होते. विलास पाटील यांना मूलबाळ न झाल्याने त्यांच्या पहिल्या पत्नीने विलास पाटील यांचं दुसरे लग्न लाऊन देत दुसरी पत्नी घरात आणली होती. एक ग्रामपचायत सदस्य होती तर दुसरी गृहिणी चे काम करीत होती. अशातच मागील काही महिन्या पूर्वी कोरोना मुळे एका महिला ग्रामपंचायत सदस्यच निधन झाले आणि त्या रिक्त झालेल्या जागे साठी पुन्हा नव्याने नुकतीच पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत विलास पाटील यांच्या दुसऱ्या पत्नीला त्यांनी उभे केले होते. यावेळी त्यांच्या विरोधात चार प्रबळ उमेदवार उभे होते, मात्र विलास पाटील आणि त्यांच्या पहिल्या पत्नीने केलेली काम पाहता पाहण गावच्या ग्रामस्थांनी विलास पाटील यांच्या दुसऱ्या पत्नी संध्या पाटील यांनादेखील भरघोस मता नी निवडून दिलेले आहे.
आपण गावच्या विकास प्रती केलिली काम आणि गावकऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते या मुळेच गावकऱ्यांनी आपल्या आणि आपल्या दोन्ही पत्नींना निवडून दिल्याचं विलास पाटील यांनी म्हटलेल आहे. विलास पाटील यांच्या दोन्ही पत्नी ममता आणि संध्या पाटील या दोन्ही ही अतिशय गुण्या गोविंदाने राहत आहेत आम्ही दोघीही विलास पाटील यांच्या दोन्ही पत्नी असलो तरी आमचे दोघींचे नाते हे बहिणी प्रमाणे राहिले आहे ममता या निवडणूक रिंगणात उभ्या होत्या त्या वेळी संध्या यांनी त्यांना सहकार्य केले होते आता संध्या निवडणुकीत उभ्या असताना त्यांना ममता यांनी सहकार्य केले आहे याशिवाय गावाचं आमच्या कुटुंबा वर असलेले प्रेम आणि आमदार किशोर पाटील यांचं सहकार्य यामुळेच आम्हाला हे यश मिळाले असल्याचे विलास पाटील यांच्या दोन्ही पत्नी संध्या आणि ममता सांगत आहेत.    विलास पाटील यांची पहिली पत्नी ममता विलास पाटील यांनी या पोटनिवडणुकीत सर्वसाधारण स्त्री या आरक्षण प्रवर्गातून निवडून आलेल्या आहेत. तर दुसरी पत्नी संध्या विलास पाटील यांनी जानेवारी 2020-21 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत वार्ड क्रमांक 3 मधून अपक्ष उमेदवार म्हणून 183 मते घेऊन दणदणीत विजय मिळविला होता.

एकाच घरात दोन्ही पत्नी राहतात गुण्यागोविंदाने

एकाच घरात दोन्ही पत्नी ,स्वतः विलास पाटील आणि त्यांची आई असा हा परिवार गुण्यागोविंदाने या ठिकाणी नांदत आहे. हे करीत असताना राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचे व्रत विलास पाटील यांनी गेल्यावर अनेक वर्षांपासून अंगिकारले आहे. ते त्यांच्या वार्डपरिसरात करत असलेली विकास कामे व समाज सेवेच्या जोरावर त्यांच्या वार्डातील नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून पहिला पत्नीने केलेल्या विकास कामांना प्रतिसाद देत दुसऱ्या पत्नीवरही विश्वास ठेवून तिलाही भरघोस मतांनी निवडून आणलेले आहे. यात पहिली पत्नी निवडणूक लढवत असताना तिला दुसऱ्या पत्नीने स्वतःची बहीण म्हणून निवडणुकीत जीवाचे रान करून प्रचार करून निवडून आणले होते. त्याची परतफेड म्हणून आता डिसेंबर महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीला तशाच पद्धतीने जीवाचे रान करून निवडून आणलेले आहे. या पोटनिवडणूकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी लागलेला आहे. आता विलास पाटील व त्यांच्या दोन्ही पत्नी यांनी गावातील नागरिकांनी आमच्या विकासकार्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आणखी झपाट्याने विकास कामे करणार असल्याचा दावा केलेला आहे .

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.