निवडणूकराजकीयराष्ट्रीय

द्रौपदी मुर्मू NDA च्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून घोषीत, भाजप अध्यक्ष जे पी नड्डांची घोषणा

द्रौपदी मुर्मू NDA च्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून घोषीत, भाजप अध्यक्ष जे पी नड्डांची घोषणा

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली आहे. मुर्मू या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेद्वार असणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या संसदीय कार्यकारी समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येऊन मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे.
आता द्रौपदी मुर्मू या NDAच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असणार आहेत.काल झालेल्या बैठकीनंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली. नड्डा म्हणाले की पहिल्यांदाच महिला आदिवासी उमेदवाराला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपालही राहिलेल्या आहेत.
20 नावांच्या चर्चेनंतर झाले शिक्कामोर्तब
जेपी नड्डा यांनी सांगितले की कार्यकारी संसदीय मंडळाच्या बैठकीत सुमारे 20 नावांवर चर्चा झाली आणि आदिवासी महिला नेत्या मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान आणि इतर अनेक नेते उपस्थित होते.
कोण आहे द्रौपदी मुर्मू ?
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजीद्रौपदी मुर्मूचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात झाला. बिरांची नारायण तुडू असे त्यांच्या वडिलांचे नाव आहे. त्या संताल कुटुंबातील आहे, जो एक आदिवासी वांशिक गट आहे. मुर्मू या प्रदीर्घ काळापासून भाजपशी जोडलेल्या आहेत. द्रौपदी मुर्मू या आदिवासी वंशाची आहेत. त्यांनी ग्राऊंड झिरोपासून राजकारणात कामाला सुरुवात केली होती. 1997 मध्ये त्या रायरंगपूरमधून पहिल्यांदा नगर पंचायतीत नगरसेवक झाल्या. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूरमधून 2 वेळा आमदारही राहिल्या आहेत. त्या भाजपा आणि बिजू जनता दलाच्या (BJD) युती सरकारमध्ये मंत्रीही होत्या. द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत. तसेच 2000 मध्ये स्थापन झाल्यापासून 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या त्या झारखंडच्या पहिल्या राज्यपाल आहेत. राज्यपाल बनलेल्या त्या पहिल्या ओडिया नेत्या आहेत.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.