रेल्वे संबंधी

नंदुरबार जवळ गांधीधाम (पुरी- अहमदाबाद) एक्सप्रेस ला भीषण आग

नंदुरबार दि-२९ : रेल्वे स्थानकाजवळ गांधीधाम ते पुरी दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसच्या शेवटच्या दोन डब्यांना आज सकाळी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

देशात गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघातांच्या संख्येत वाढ झालेली आहे. त्यातच गुजरातमधील गांधीधाम ते मध्यप्रदेशातील पुरी दरम्यान धावणाऱ्या गांधीधाम पुरी एक्सप्रेसला नंदुरबार स्टेशनपासून काही अंतरावर असताना शेवटच्या दोन डब्यांना भीषण आग लागली. त्यानंतर ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमली आहे.
गांधीधाम- पुरी एक्सप्रेस पुरीच्या दिशेने निघाली होती. मात्र नंदुरबार स्टेशनच्या बाहेर असतानाच रेल्वेच्या शेवटच्या दोन डब्यांना आग लागली. तर ही आग पॅन्ट्रीच्या डब्याला लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या डब्यात स्वयंपाकाचे साहित्य, गॅस सिलिंडर असल्याने आग मोठ्या प्रमाणावर पसरली तर आग लागलेल्या इतर डब्यांपासून वेगळे करण्यात आले आहे. याबरोबरच जीवितहानीची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तर रेल्वेला आग लागताच रेल्वे प्रशासनाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तसेच प्रवाशांना गाडीतून उतरवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. तर सध्या अग्निशमन दलाच्या चार गाड्या आग विझविण्याचे काम करीत आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.