क्राईम

नवजात बाळाला लेंडीनाल्यात फेकून मातेचे पलायन

  • जळगाव डांभुर्णी ता.यावल येथुन जवळच असलेल्या निलाॕन्स कंपनीच्या परीसरात आज दि.20 डिसेंबर रोजी कोळन्हावी चोपडा महामार्गावरील लेंडी नाल्याच्या पुलाजवळ शेतकऱ्यांच्या बांधालगत जिवंत असलेले पुरुष जातीचे गोंडस बाळ अज्ञात महिलेने फेकून पसार झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आलेली आहे. या निरागस बालकाला असे नाल्यात फेकून दिल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा जळगाव मार्गावरील शेतात काही महिला शेत नींदणीचे काम करत असतांना एका महिला गवताचे ओझे बांधावर टाकण्यास गेली असता त्या ठिकाणी एक लहान नवजात बाळ रडत असल्याचा आवाज आल्याने ती घाबरुन महिलांकडे पळाली,आणि याबाबत सखोल माहितीसाठी सर्व महिला एकवटून त्या आवाजाच्या दिशेने गेल्या असता त्या ठिकाणी त्यांना कापडात गुंढाळुन बेवारस पडलेले पुरूष जातीचे जिवंत बाळ निदर्शनास आले. याबाबत त्या महिलांनी तातडीने गावातील पोलिस पाटलांशी संपर्क साधून त्या बाळाला पोलिस पाटलाच्या स्वाधीन केले. पोलिस पाटलांसह अनेकांनी बाळाला पाहण्यासाठी गर्दी केली. डांभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कामकाज सांभाळणारे वैद्यकीय अधिकारी डाॕ सोनल चौधरी व डाॕ प्रशांत भंगाळे यांनी बाळाची तपासणी केली असता बाळाचे वजन 2.10 ग्रॕम भरलेले असून बाळ पूर्ण दिवसांचे असल्याचे सांगण्यात आले. यात विशेषतः बाळाचा जन्म हा दोन ते तीन तासापुर्वीच झाला असावा असा प्राथमिक अंदाजही लावण्यात आला. त्यामुळे हे बाळ पुरूष जातीचे असूनही फेकले कुणी? ती महीला कोण ? असे तर्क वितर्क या परीसरात लावले जात आहे. त्या जिवंत बाळाला घेऊन पोलिस पाटील व सहकारी यांनी ग्रामीण रुग्णालय यावल येथे जाऊन ते बाळ पोलीसांच्या स्वाधीन करणार असल्याचे नागरिकानी सांगितले .याबाबत यावल पोलीसांशी संपर्क साधला असता बाळाची तपासणी करुन त्याला जळगाव येथे शिशुगृहात घेऊन जाणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. याबाबत जळगाव येथील प्रसुती रूग्णालयांमध्ये चौकशी करण्यात येत असून बाळाच्या मातेचा कसून शोध घेतलला जात आहे.
Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.