क्राईम/कोर्टमहाराष्ट्रमुंबईराजकीय

विधानसभा अध्यक्षांच्या ईमेल आयडीवर सायबर हल्ला, राज्यपालांना पाठवला धक्कादायक मेल

शिवसेना आमदारांवर कारवाई करण्याची मागणी

मुंबई दि-5 मार्च, एकीकडे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापू लागल्यामुळे अनेक राजकीय घडामोडी सुरू असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी सायबर हल्लेखोरांनी हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. अध्यक्षांचा ईमेल आयडी हॅक करुन त्यावरून राज्यपालांना ईमेल पाठविण्यात आला आहे. त्या मेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांवर कारवाई करण्याचं म्हटलेलं आहे. या हॅकींग प्रकारमुळे विधानसभा अध्यक्षांच्या सायबर सुरक्षेसंदर्भात मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. या प्रकरणी आता मुंबईतील मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या मेलमध्ये आमदार सभागृहात हाणामारी करतात. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कुलाबा विधानसभेचे आमदार असलेले राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदासारख्या संवैधानिक पदांची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. विधानसभेतील अनेक संवेदनशील बाबी त्यांच्याकडे आहेत. नुकतीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा या प्रकरणाचा निकाल दिला होता. त्यापूर्वी शिवसेना पक्ष कोणाचा याचाही त्यांनी निकाल दिलेला होता. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात विधानसभा अध्यक्षांना मेल करण्यात आला होता. यामुळे त्यांचा मेल हॅक होण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या प्रकरणी आता सायबर पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. परंतु एकंदरीत विधिमंडळातील सायबर सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या वर्षी ठाणे पोलीस आयुक्तांची वेबसाईट चीनमधून हॅक करण्यात आली होती.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button