क्राईम

नवजीवन एक्सप्रेसमध्ये तमिळनाडूतून चोरलेले 50 लाख जळगाव LCB ने पकडले

जळगाव – तमिळनाडू राज्यातून मालकाच्या घरातून नोकरांनी तब्बल ५० लाख रूपयांची रोकड लांबविली होती. याबाबत माहिती मिळताच सापळा रचून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव-मालेगाव दरम्यान नवजीवन एक्सप्रेसमधून दोन जणांना ५० लाखांच्या रोकडसह अटक केलेली आहे. या कारवाईमुळे पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मोहनकुमार जगाथागी, देवनयागम स्टे,सेवापेट,सेलम ( तमिळनाडु ) यांचे कडे दिनांक :१९/०५/२०२१ रोजी सांयकाळी १९:०० ते दिनांक :- २०/०५/२०२१ रोजी सांयकाळी १९:३० चे दरम्यान त्याचे रहाते घरातुन त्यांचे कडेस कामाला असलेले नौकर यांनी जबरी चोरी करुन ५०,०००,००/- ( पन्नास लाख रुपये ) चोरी करुन नेले होते. त्या अनुषंगाने सेलम पोलीस स्टेशन (तमिळनाडु) भाग – ५ गुरन.२४८/२०२१ भादवि.क ३९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील दोन आरोपी हे राजस्थान मधील होते ते आरोपी हे राजस्थान मध्ये गुन्हयातील मुद्देमालासह जाणार असल्याची माहिती सेलम चे पोलीस अधीक्षक यांना मिळाली होती . त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक सेलम यांनी डॉ.श्री.प्रविण मुंढे पोलीस अधीक्षक जळगाव यांना आरोपी बाबत सर्व माहिती कळवली होती. डॉ.श्री.प्रविण मुंढे पोलीस अधीक्षक जळगाव यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार बकाले यांना सदर आरोपीतांना मुद्देमालासह ताब्यात घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले होते. पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील स.फौ.अशोक महाजन,शरीफ काझी,युनुस शेख,प्रदीप पाटील, जयंत चौधरी , सुनिल दामोदरे,विनोद सुभाष पाटील, किशोर राठोड, रणजित जाधव, मुरलीधर बारी अशांना रवाना केले होते. सदर चे पथक हे मलकापुर ते जळगाव या दरम्यान चेन्नई – अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस ची तपासणी करुन आरोपी १) मंगलराम आसुराम बिस्नोई. वय – १९ रा.खडाली ता.गुडामालाणी,जि.बाडमेर ( राजस्थान ) यांचे सह एक अल्पवयीन मुलास ताब्यात घेवुन त्यांची नवजीवन एक्सप्रेस मध्येच अधिक चौकशी केली असता त्यांचे कडेस सेलम पोलीस स्टेशन ( तामिळनाडु ) भाग – ५ गुरन २४८/२०२१ भादवि.क.३९२ या गुन्हयातील चोरी गेलेला मुद्देमालापैकी ३७,९७,७८०/- रुपये मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेतले आहे. डॉ.श्री.प्रविण मुंढे पोलीस अधीक्षक जळगाव यांचे सुचनेनुसार तामिळनाडु पोलीस राज्यातील संबंधीत पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी सदर आरोपीतांना घेण्यास येत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.