क्राईम

नशिराबाद जवळ राष्ट्रीय महामार्गावर डंपर-टँकरचा भीषण अपघात,एक ठार

नशिराबाद- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर नशिराबाद जवळ आज दुपारी १२.०० वाजेच्या दरम्यान दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झालेला आहे. सदरील दोन्ही वाहनांच्या चालकांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आलेले होते. यापैकी डंपर चालक देवानंद नथू पाटील (वय 35 ) रा. साकेगाव ता.भुसावळ यांचे दवाखान्यात उपचारा दरम्यान निधन झालेले असून टँकर चालक गंभीर जखमी असल्याचे नशिराबाद पोलिस सूत्रांनी सांगितले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास जळगाव कडून येणारे ऑइलने भरलेले टँकर एम.एच.१८ बी.ए.४१८८ हे भुसावळ कडे जात असतांना जळगावकडे जाणारे डंपर एम.एच.१९ झेड.३१२३ हे भरधाव वेगाने आल्याने यांच्या दोघांमध्ये जोरदार धडक झाल्याने दोघे वाहनांचे मोठे नुकसान झालेले आहे. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.