नागपूरात कोरोनाचा हाहाकार!! 6 दिवसात तिनशेच्या वर मृत्यू

नागपूर दि:2 राज्याची उपराजधानी नागपूर कोरोनाच्या घट्ट विळख्यात आलेली आहे. नागपुर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं तांडव सुरुच आहे. देशातील सर्वात जास्त मृत्यूदर नागपुरात असून 27 मार्च पासून आतापर्यंत साडेतिनशे जणांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनासोबतच नागपूरकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यासोबतच इथे मृत्यूची संख्या वाढत चालली आहे. दर दिवसाला 3 हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोना बाधीत आढळून येत आहेत. गेल्या मार्च महिन्याच्या 27 तारखेपासून मृत्यूचा आकडा सलग 50 च्या वरच पोहोचलेला दिसून येत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी 60 जणांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. याला नागपूरकरांचा हलगर्जी जीवावर बेतला असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. कोरोनाची लक्षणे दिसून आल्यावरही सुरुवातीचे काही दिवस घरीच औषधोपचार करुन नागरिक घरातच राहत आहेत. कोरोनाची लक्षणे दिसून आल्यावर सुरुवातीलाच डॉक्टरांचा सल्ला न घेणे आणि कोरोना चाचणी करत नसल्याचे चित्र नागपूरात आरोग्य यंत्रणेच्या निरीक्षणात नोंदवले गेलेले आहे. हे रोजचे मृत्यूचे आकडे बघून नागपूरकरांची झोप उडालेली आहे. सोबतच प्रशासनाच्या गलथान कारभाराची पोलखोल सुद्धा करत आहे.
नागपुरात वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यू
27 मार्च – 3688 रुग्ण , 54 मृत्यू
28 मार्च – 3970 रुग्ण , 58 मृत्यू
29 मार्च – 3177 रुग्ण , 55 मृत्यू
30 मार्च – 1156 रुग्ण , 54 मृत्यू
31 मार्च – 2885 रुग्ण , 58 मृत्यू
1 एप्रिल – 3639 रुग्ण , 60 मृत्यू