राजकीय

नाट्यकर्मींच्या आर्थिक सहकार्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करणार-ॲड सौ. रोहिणीताई खडसे

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील रंगकर्मी व रसिकांसमवेत अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे जागतिक मराठी रंगभूमी दिवस कोव्हिड संदर्भातील सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळून उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेच्या अध्यक्षा सौ. रोहिणीताई खडसे खेवलकर व नाट्यपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत शहराचे आमदार राजूमामा भोळे, महापौर सौ.भारतीताई सोनवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रभैय्या पाटील, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, उपाध्यक्ष रत्नाकर पाटील, नगरसेवक अनंत जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोव्हिड-19 मुळे मान्यवरांचे केवळ हात जोडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर नटराज पूजन व रंगभूमी पूजन झाल्यावर परिषदेचे कार्यकारिणी सदस्य शरद पांडे यांनी नांदी म्हटली. कार्यक्रमाप्रसंगी सोशल डिस्टसिंगचे नियम पाळण्याबाबत केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाचे श्री.मोरे यांनी उपस्थितांना विनंतीवजा सूचना केल्यात. त्यानंतर मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. यात प्रथम बोलताना अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेच्या अध्यक्षा सौ. रोहिणीताई खडसे खेवलकर याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की, जागतिक मराठी रंगभूमीच्या सर्व नाट्यकलावंत व नाट्यरसिकांना मनःपूर्वक शुभेच्छा देत असताना कोव्हिड काळातील आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक नियम पाळणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले. लॉकडाऊनच्या काळात नाट्यगृहाशी संबंधित कर्मचारी वर्ग व रंगकर्मी यांना आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी लवकरच महाराष्ट्र शासनाकडे आम्ही भरीव अशा मदतीची मागणी करणार आहोत. आठ महिन्यांच्या लॉकडाऊननंतर नाट्यगृह उघडण्यास परवानगी दिल्याबद्दल शासनाचे आभारही त्यांनी मानले. केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर रंगभूमीदिनाचे औचित्य साधून नाट्यगृह उघडणे हा सुवर्णकांचन योग असून, केशवस्मृती प्रतिष्ठान सांस्कृतिक चळवळीच्या कायम पाठीशी आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह सांस्कृतिक चळवळीला वेळ पडली तर पदरमोड करूनसुध्दा देण्यास आम्ही तयार आहोत. शहराचा सांस्कृतिक चेहरा अधिक उज्ज्वल व्हावा, यासाठी ‘कमी तिथे आम्ही’ या उक्तीप्रमाणे केशवस्मृती प्रतिष्ठान कटीबध्द आहे. कोव्हिडचे आरोग्यसंदर्भातील सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळून नाट्यगृह सुरु केल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभारी आहोत.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रभैय्या पाटील बोलताना म्हणाले की, नाट्यगृह सुरु केल्याबद्दल प्रथमतः शासनाचे आभार. उत्तर महाराष्ट्रातील एकमेव असलेले भव्य व सर्वसुविधांनी सुसज्ज असलेले नाट्यगृह जळगाव शहरात असल्याचा आम्हांला अभिमान आहे. सांस्कृतिक चळवळीला आमच्यातर्फे काहीही योगदान देणे शक्य असले, तेव्हा कलावंतांनी फक्त आम्हांला हाक द्यावी, असे आवाहन त्यांनी शेवटी केले. सदरील कार्यक्रमात शहराचे आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे, नगरसेवक अनंत जोशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष शंभू पाटील यांनी केले. रंगभूमीपूजनानिमित्त शहराच्या महापौर सौ.भारतीताई सोनवणे, उपाध्यक्ष ॲड.संजय राणे, कोषाध्यक्ष प्रा.शमा सराफ यांच्यासह जळगावातील प्रा.राजेंद्र देशमुख चिंतामण पाटील, शरद पांडे, पियुष रावळ,ॲड.पद्मनाभ देशपांडे, ललित पाटील , प्रविण पांडे, केशवस्मृती प्रतिष्ठानचे रत्नाकर पाटील,अनिल मोरे , किरण सोहळे, विनोद ढगे ,अरुण सानप, पुरुषोत्तम चौधरी, भुसावळचे रंगकर्मी अनिल कोष्टी, सुरेश बारी, राज्य नाट्य समन्वयिका सौ.सरिता खाचणे, मायटी ब्रदर्सचे मिलिंद थत्ते, होरीलसिंग राजपूत आदी रंगकर्मी या ठिकाणी उपस्थित होते.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.