मनोरंजनराष्ट्रीय

नादम’ भारतीय संगीताच्या सौंदर्याची आणि विविधतेची जिवंत झलक सादर करते: दिग्दर्शक इंद्रजित नट्टोजी

मुंबई, 31 मे 2022

 

भारतीय संगीत समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे. संगीत आपल्या जीवनाचा एक मार्ग आहे. ‘नादम’ हा चित्रपट भारतीय संगीताच्या सौंदर्याची आणि विविधतेची जिवंत झलक दाखवतो, असे दिग्दर्शक इंद्रजित नट्टोजी यांनी आज 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सांगितले.

‘#मिफडायलोग’मध्‍ये  बोलताना इंद्रजित म्हणाले, “आपण ऐकतो तो प्रत्येक आवाज म्हणजे संगीतातली ‘नोट’ आहे. संगीत म्हणजे अशा नोट्सच्या मालिकेशिवाय दुसरे काहीही नाही. माझी मुलगी सात वर्षांची होती आणि ती रात्री काही आवाज ऐकून उठायची. हीच  कल्पना मी घेतली आणि एक कथा तयार केली.”

ते म्हणाले, चित्रपटाचे वेगळेपण हेच त्याचे स्वरूप आहे. “टीव्ही आणि सामान्य सिनेमापेक्षा वेगळे म्हणजे, ‘नादम’ 1:6 फ्रेममध्ये चित्रीत करण्‍यात आला आहे. तुम्ही एकाच वेळी संपूर्ण स्क्रीन कव्हर करू शकत नाही. त्यामुळे ध्वनी तुम्हाला कुठे पाहायचे याचे मार्गदर्शन करतो, अशा प्रकारे चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. हा एक अतिशय आव्हानात्मक प्रकल्प होता,” असेही इंद्रिजित  पुढे म्हणाले.

चित्रपटाविषयी :- नादम 

दिग्दर्शक : इंद्रजित नट्टोजी

निर्माता : इंद्रजित नट्टोजी

अॅनिमेटर : उपासना नट्टोजी रॉय

ध्‍वनी(साउंड) डिझायनर : अनिश गोहिल

दिग्‍दर्शकाविषयी माहिती

इंद्रजित नट्टोजी हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, अहमदाबादचे पदवीधर आहेत, त्यांनी  फिल्म आणि ग्राफिक डिझाइनमध्ये प्रावीण्‍य मिळविले आहे. इंद्रजित  पुरस्कार विजेते दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता आहेत. वयाच्या  22 व्या वर्षी त्यांनी स्वत:चे   ब्लिंक पिक्चर्स नावाचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. त्यांनी बंगलुरू येथील ‘भारतीय संगीत अनुभव संग्रहालया’साठी दोन मोठ्या चित्रपटांची संकल्पना मांडून त्‍यांची निर्मिती केली आहे. इंद्रिजित उत्तम चित्रकारही आहेत. कोलकाता आणि मुंबईतील कलादालनांमध्ये त्यांच्या चित्रांचे प्रदर्शने  भरविण्‍यात आली होती.  इंद्रजित यांनी  ‘आगे से राईट’  आणि ‘ आफत-ए-इश्क’ यांसारख्या  चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे.

सारांश

श्रुती, एक तरुण मुलगी, रात्रीच्या आवाजाने त्रासलेली आणि घाबरून जागी होते. तिची आई प्रत्येक आवाज ही संगीताचे नोटेशन आहे, हे दाखवून तिला दिलासा देते. भारतीय संगीताचा अनुभव घेता यावा, यासाठी भारतीय संगीताविषयीचे  पहिले   कायमस्वरूपी परस्परसंवादी संग्रहालय असणारी कलाकृती आहे.  हा चित्रपट 180 अंशांमध्‍ये विलीन होणा-या वर्तुळाकार सादरीकरणासाठी  डिझाइन केला आहे, भारतीय संगीतामधल्या  सौंदर्याची आणि विविधतेची एक सळसळती, जिवंत झलक या चित्रपटातून दिसते.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.