

त्याचबरोबर कुठल्याही योजनेअंतर्गत नाबार्डचा प्रत्यक्ष लाभार्थीसोबत संबंध येत नाही. यासाठी नाबार्ड कुठलेही शुल्क अथवा कमीशनही आकारत नाही. जिल्हा विकास प्रबंधकाव्यतिरिक्त जिल्ह्यात नाबार्डचा कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी पदस्थापित अथवा नियुक्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे नाबार्डचा अधिकारी असल्याचे सांगून कोणी लाभार्यांशी कुठलाही आर्थिक व्यवहार करीत असल्यास ती लाभार्थ्यांची फसवणूक ठरु शकते याची नोंद घ्यावी , असे आवाहन नाबार्डचे जळगाव जिल्हा विकास अधिकारी श्रीकांत झांबरे जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केलेले आहे.