नाशिकमधील डॉ.सुवर्णा वाजेंच्या मृत्यूचे गूढ उकलले, मात्र अधिक तपास सुरुच

नाशिक – मयत डॉ. सुवर्णा वाजे या महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. नेहमीप्रमाणे त्या 25 जानेवारी रोजीही रुग्णालयात आपली ड्युटी बजावली होती. त्यानंतर त्या घरी जाण्यास निघाल्या. मात्र घरी पोहचल्याच नाही. सुवर्णा यांचा कुठेच शोध लागत नसल्यामुळें पती संदिप वाजेने स्थानिक पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर त्यांची गाड़ी मुंबई-नाशिक महामार्गावर रायगडनगरच्या
मिल्ट्री गेटसमोर पूर्णपणे जळालेल्या अवस्थेंत सापडली होती. तसेच गाडीत जळालेली हाडे सापडली होती. त्यामुळे सुरवातीला हा घातपाताचा प्रकार असल्याचंही वाटले होते.आज ती हाडे सुवर्णा वाजेंचीच असल्याचे आजच्या DNA अहवालावरून निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे गूढ वाढलेले होते.
याप्रकरणी पोलिसांनी तपासाला गती देत वाजे यांच्या बहिणीसह रुग्णालयातील सहकाऱ्यांचे जाबजबाब नोंदवले होते. माहेरच्या लोकांकडून तसेच पतीकडूनही विचारपूस करण्यात आली. मात्र कुणालाच काहीच माहित नव्हते.
दरम्यान तपासाला वेग देत पोलिसांनी त्यादिवशीचे शहरातील स्वामी समर्थ रूग्णालय ते महामार्ग असे सर्व महत्वपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले. अखेर या हत्येचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश आले. कौटुंबिक वादातून पती संदीपनेच सुवर्णा वाजे यांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. मात्र सुवर्णा वाजे आणि त्यांच्या पतीमध्ये नेमका काय वादविवाद झाला होता ? आणि त्यांच्या पतीने मिल्ट्री गेट समोर गाडी नेमकी कशी पेटवली? याबाबत पोलीसांचा सखोल चौकशी करून अधिक तपास सुरु आहे.