आरोग्य

नाशिकमध्ये कॉलेज बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 25 विद्यार्थी गंभीर

नाशिक दि-4: नाशिकमध्ये ट्रक आणि कॉलेज बसचा अपघात झालेला असून या अपघातात 25 विद्यार्थी जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. नाशिक-औरंगाबाद महामार्गावर आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झालेला असून यात 25 विद्यार्थी जखमी झाले आहेत. यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व जखमी विद्यार्थ्यांना नजीकच्या आडगाव नाक्यावरील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धामणगाव येथील SMBT मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आणि कर्मचारी यांना घेऊन कॉलेजची बस क्रमांक (MH-15 EF 2526) जात होती. या मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा हा अपघात झालेला आहे.या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झालेला आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेतलेला असून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.