Crime

नाशिकमध्ये चारचाकीत महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला

नाशिकः शहरात प्रजासत्ताक दिनी एक धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे. नाशिकजवळ महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. डॉ. सुवर्णा वाझे- जाधव असे त्यांचे नाव आहे. सध्या घटनास्थळावर पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी दाखल झाले आहेत. त्यांनी तपास कार्य देखील सुरू केले आहे. मात्र, अचानक एका अधिकाऱ्याचा मृतदेह सापडतो काय, याविषयी शहरात विविध तर्कवितर्क आणि चर्चांना उधाण आले आहे.
डॉ. सुवर्णा वाझे- जाधव या आरोग्य विभागात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत होते. आज नाशिकमधील वाडीवऱ्हे परिसरात एका पूर्णपणे जळालेल्या चारचाकीत त्यांचा मृतदेह सापडला आहे. याची धक्कादायक माहिती परिसरामधील नागरिकांनी पोलिसांना दिली. यानंतर पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी सध्या घटनास्थळावर दाखल झाले आहेत. नेमका हा प्रकार कशाचा आहे, घातपात की आणखी काही ? याचा तपास सध्या पोलिस करत आहेत.

मात्र, या घटनेने महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. नाशिकची नेमकी वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे, असा प्रश्न परत एकदा यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. नाशिकमध्ये सगळीकडे प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. महापालिकेत देखील हा उत्साह होता. सारे ध्वजारोहण समारंभात व्यस्त होते. मात्र, काही वेळातच महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाझे- जाधव यांचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक बातमी येऊन धडकली आणि साऱ्यांनाच धक्का बसला आहे
यामुळे अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. आता पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
चक्क एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह सापडल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा लवकरात लवकर सखोल तपास करुन सत्यम समोर आणावे, असा सूर महापालिका कर्मचाऱ्यांमधून उमटत आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.