आरोग्य

नाशिकमध्ये राज्यपालांचे पालकमंत्री छगन भुजबळांकडून खास स्वागत

नाशिक दि-31: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज पुन्हा नाशिक जिल्हाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी जात असताना नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे आले होते. त्यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांची या ठिकाणी भेट घेतली. इतकेच नाही तर भुजबळांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागतही केले. या भेटीत राज्यपाल कोश्यारी आणि छगन भुजबळ यांच्यात थोडावेळ चर्चाही पार पडली.
दरम्यान ,पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन स्वागत केल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात दिवसभर चर्चांना उधाण आलेले आहेत.
या भेटीदरम्यान नाशिकचे महापौर सतिश कुलकर्णी, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव, भाजपच्या आमदार देवयानी फरांदे ,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी उपस्थित होते.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.