आरोग्य

नाशिकमध्ये शिवशाही बसने दुचाकीस्वाराला उडविले, उड्डाणपुलाच्या पिलरवर आदळली बस

नाशिकः नाशिकमध्ये शिवशाही बस उड्डाणपुलाच्या पिलरवर आदळल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर 7 जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडलेली आहे. औरंगाबाद महामार्गावर तपोवन वळणावर हा अपघात झालेला आहे. ही बस नाशिकहून औरंगाबादकडे जात होती. मात्र,बस चालकाचे भरधाव बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस थेट उड्डाणपुलाखालील 44 नंबरच्या पिलरवर जावून धडकली.

दरम्यान, दुसरीकडे अजूनही पुरेसी बससेवा सुरू नाही. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. जे काही मोजके कर्मचारी कामावर आहेत त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण वाढल्याचे दिसून येत आहे. एसटी महामंडळाने नवीन कंत्राटी कर्मचारी भरतीही पुरेशी केली नाही. त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. कदाचित आज शिवशाहीचा झालेला अपघात हा कामाच्या अती ताणातून झाला नसेल ना,अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, शिवशाही बस नाशिकहून औरंगाबादकडे निघाली होती. ही बस तपोवन वळणावर आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे शिवशाही थेट उड्डाणपुलाखाली असलेल्या पिलरवर जावून धडकली. यावेळी बसच्या धडकेत समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. त्याचे नाव अजून समजू शकलेले नाही. या अपघातामध्ये बसमधील सात प्रवासी जखमी झाले असून त्यांच्या वर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आलेले आहेत.

दरम्यान, राज्यात एसटी महामंडळाचा संप मिटल्याची घोषणा सरकारने केली असली तरी अजूनही बससेवा सुरळीत सुरू झालेली नाही. त्यामुळे सर्वच ठिकाणी प्रवाशांचे हाल सुरू आहेत.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.