आरोग्य
नाशिक पोलिस अकादमीत 167पोलिस कोरोनाबाधीत आढळल्याने खळबळ

नाशिक – नाशिकमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात कोरोनाने शिरकाव केला असून येथे तब्बल 167जण कोरोनाबाधीत आढळून आलेले आहेत. यात पोलीस अधिकारी, प्रशिक्षणार्थी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे नाशिक जिल्हा प्रशासनात प्रचंड खळबळ उडालेली आहेत. नाशिकमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमीत उपनिरीक्षक पदासाठी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले जाते आहे. या पोलिस अकादमीत राज्यभरातून उमेद्वार प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले असतात. या सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात आली असता यातील तब्बल 167 जण कोरोनाबाधीत आढळून आलेले आहेत.या सर्व कोरोनाबाधीत कर्मचाऱ्यांना नाशिक येथील ठक्कर डोम कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेले आहे.