ठाणेमुंबईराजकीयवृत्तविशेषसोलापूर

ना ठाकरे ना फडणवीस, विठूरायाची पूजा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते ,सर्व चर्चांना लागला ब्रेक

आज दुपारपर्यंत सध्या राज्यात असलेल्या राजकीय परिस्थितीमुळे यंदाच्या पंढरपूरच्या शासकीय पुजेसाठी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे जाणार का की देवेंद्र फडणवीस पूजा करणार ? याची उत्सुकता लागली होती. जर महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करता आले नाही तर राज्यात नवे सरकार स्थापन होण्याची शक्यता होतीच,तसेच नवे सरकार आले तर हा शासकीय महापूजेचा मान नव्या मुख्यमंत्र्याला मिळण्याची शक्यता होती.त्यातही देवेंद्र फडणवीस हे नवीन सरकारचे मुख्यमंत्री होऊ शकतात याची दाट शक्यता वाटत होती.

पंढरपूरच्या विठूरायाची शासकीय महापूजा कोण करणार? ठाकरे की फडणवीस यासंदर्भात सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत.
सर्वात मोठा धक्कादायक झटका
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा उलटफेर आज राजभवनात पाहायला मिळाला. शपथविधी सोहळ्यापूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत अनपेक्षित आणी तितक्याच धक्कादायक निर्णयाची घोषणा केली. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. या घोषणेबरोबरच  देवेंद्र फडणवीसांनी सोशल मीडियावरील यंदा आषाढीची पूजा कोण करणार हा संभ्रम देखील दूर केला आहे.
अखंड वारकरी सांप्रदाय ज्याची आस लावून असलेला आषाढी वारी सोहळा दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात पार पडत आहे.संत ज्ञानेश्वरांसह अनेक मानाच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. पायी प्रवास पूर्ण करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहचेल. तर 10 जुलैला आषाढी एकादशी साजरी होणार आहे.  विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान हा अनेक वर्षांपासून मुख्यमंत्र्यांकडे आहे.  आजपर्यंत सर्वाधिक वेळा या शासकीय पूजेचा मान हा दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मिळाला आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी पूजा केली होती. राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे  शासकीय महापूजेचा मान राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदेना मिळणार आहे. 

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.