निंबादेवी धरणावर हजारो पर्यटकाची तुफान गर्दी


यावल तालुक्यातील चुंचाळे जवळ असलेल्या निंबादेवी धरणावर रविवारी हजारोंच्या संख्येत पर्यटक आले होते यात ‘वाहत्या पाण्यात हवी मौज मस्ती, आम्हाला नाही कोरोनाची भिती ’ असे चित्र त्या ठिकाणी दिसत सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला होता. सातपुड्याच्या पायथ्याशी येथे जणू जत्राचं भरलेली दिसली तर कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलिस प्रशासना सह वनविभाग कडून कुठलाचं बंदोबस्त नव्हता व कुणी ही कुठेही बिनधास्त वावरतांना, तर वनक्षेत्रात दारू रिचवतांना दिसत होते. येथे आलेल्या एकाही पर्यटकाने तोंडाला मास्क लावला नव्हता. परिणामी येथून जिल्ह्याभरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.चुंचाळे ता. यावल येथून सातपुड्याच्या कुशीत सहा किलोमीटर अंतरावर निंबादेवी धरण आहे. १६.६२ दलघमी जलसाठा क्षमता असलेले ह धरण सातपुड्यात झालेल्या दमदार पावसामुळे धरण १०० टक्के भरले असून सांडव्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विर्सग सुरू आहे.तर या वाहत्या पाण्यात आंघोळ सह सातपुड्यात पर्यटनाकरिता जिल्ह्या भरातून हजारोंच्या संख्येने पर्यटक येत आहे. यात या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना रस्त्यात कुणी अडवत नाही तर या ठिकाणी येणारे पर्यटक तोंडाला मास्क न लावता येथे आनंद लुटतांना फिजिकल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडवत आहे. संपुर्ण जिल्ह्याला या ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे धोका निर्माण होवु शकतो अशी वास्तवता येथे बघायला मिळत आहे. गर्दी करून पाण्यात आंघोळ करताना आनंद लुटताना येथे ‘वाहत्या पाण्यात हवी मौज मस्ती, आम्हाला नाही कोरोनाची भिती’ असे दिसत आहे.
सातपुड्यात थाटली दुकाने.
कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन शितील केले तरी बऱ्याच अटी व्यावसायीकांना आहे मात्र,सातपुड्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुकान थाटली जात आहे. व बिनधास्त पणे या ठिकाणी व्यावसाय केला जात आहे.याबाबत पोलिस प्रशासनासह वन विभागाच्या प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
वाद विवाद, दारूच्या पार्ट्या.
येथे होणारी गर्दी यात मोठ्या प्रमाणावर दारूच्या पार्ट्या देेखील सातपुड्यात रंगत असुन दरराेज येथे वाद, विवाद नित्याचेे झाले आहे रविवारी तर हजारोंच्या संख्येत पर्यटक या ठिकाणी होते तेव्हा या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता जळगाव जिल्ह्यात येथुनचं कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.