निंबादेवी धरण प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत-प्रांताधिकारी अजित थोरबोले

दि-31/08/2020 देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना, आणि शासन गर्दी टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असताना सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवत यावल तालुक्यातील चुंचाळे-सावखेडा सिम परिसरातील निंबा देवी धरणावर हजारो पर्यटकांनी कोणताही मास्क न लावता, सोशल डिस्टंन्सिग न ठेवता तुफान गर्दी केलेली होती. या गर्दीचे फोटोसह वृत्त आज मिडिया मेल न्यूजने दाखविल्यानंतर फैजपूरचे प्रांताधिकारी श्री अजित थोरबोले यांनी या वृत्ताची तात्काळ दखल घेत ,या धरणावर होणारी गर्दी टाळण्यासाठी निंबादेवी धरण, सावखेडा सीम ता.यावल च्या एक किमी अंतरातील परीघाचे क्षेत्र हे प्रतिबंधीत क्षेत्र (containment area) म्हणून घोषीत करण्यात आलेले आहे. या प्रतिबंधीत क्षेत्रात पूर्णपणे संचारबंदी लागू करण्यात आलेली असून सदर क्षेत्रात प्रवेश आणि निर्गमन करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांवर 500 रू दंड आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून त्यांना संस्था विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.असे आदेश फैजपूरचे उपविभागीय अधिकारी तथा Incident Commander श्री जित थोरबोले यांनी आज काढलेले आहे.