निवडणूकमुंबईराजकीयराष्ट्रीय

नितीन गडकरी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री ? मोदी-शहांचा नवा प्लॅन-B ? देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बढती ?

नितीन गडकरी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री ? मोदी-शहांचा नवा प्लॅन-B ? देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बढती ?

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार धोक्यात आल्याची चिन्हे आता स्पष्टपणे दिसू लागलेली असून आसाममधील गुवाहाटी येथे शिवसेना व इतर अपक्ष आमदार असे मिळून ५० पेक्षा जास्त आमदार माझ्या पाठीशी असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे. तसेच त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षासह युतीचे सरकार स्थापन करण्यासाठी वेगळी चूल मांडल्याने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडालेली आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या चालू राजकीय घडामोडींवर दिल्लीतील भाजपचे पक्षश्रेष्ठी बारीक लक्ष ठेवून असून त्यांच्याशी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन गेले दोन दिवस सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर आलेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे असलेले अधिकृत संख्याबळ किती व त्यांना कायद्यांच्या तरतूदींचा आधार आहे का ? याचा भाजपचे दिल्लीतील शीर्ष नेते अभ्यास करत आहे.भाजपच्या अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदेंच बंड हा शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत शिंदेंशी सत्तास्थापनेसंदर्भात अजून पर्यंत कोणताही प्रस्ताव सादर केलेला नसल्याचा दावा केलेला आहे.
दरम्यान, दिल्लीत गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणी भुपेंद्र यादव त्यांच्यात महाराष्ट्रात सत्ता स्थापन करावयची असल्यास देवेंद्र फडणवीस ऐवजी मोदी सरकारमधील सर्वात कार्यकुशल मंत्री म्हणून ओळखले जाणारे नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री पदासाठी पुढे केल्यास मविआ सह विरोधी पक्षांंतून भाजपच्या सत्ता स्थापनेला होणारा विरोध काही अंशी मावळू शकतो, असा अंदाज भाजपच्या पक्षश्रेष्ठींना आहे. नितीन गडकरी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुढे केल्यास देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बढती दिली जाऊ शकते का ? यावर भाजपच्या पक्षा नेतृत्वाचे विचारमंथन सुरू आहे.नितीन गडकरी यांचे महाराष्ट्रातील शिवसेना राष्ट्रवादीसह अनेक राजकीय पक्षामधील अनेक नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत. या संबंधांचा नितीन गडकरी यांनी खुबीने वापर करून घेऊन एकनाथ शिंदेंच्या बंडखोर गटासह सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यास भाजपला ‘मविआ’ कडून होणारा विरोध हा मावळू शकतो. सत्तास्थापनेचा मोदी-शहांचा हा प्लॅन बी असल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून समोर आलेले आहे.मात्र आता पुढे काय घडामोडी घडतात यावर साऱ्या महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून आहे. नितीन गडकरी यांनी यापूर्वी अनेकदा राष्ट्रीय राजकारणातून महाराष्ट्राच्या राजकारणात परतणार नसल्याचे सांगितलेलं आहे.परंतु महाराष्ट्रातील सत्तेसंदर्भात बदललेल्या आणी चालू अस्थीर राजकीय परिस्थितीला बघून भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी नितीन गडकरी हे मोदी-शहांच्या संभाव्य नीतीला प्रतिसाद देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होतात का ? हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.