निलंबित DCP सौरभ त्रिपाठींच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी

मुंबई दि-14 मुंबईतील अंगडिया नामक तक्रारदाराकडून 10 कोटींची कथीत खंडणी मागितल्या प्रकरणी मुंबई येथील पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता तेव्हापासून ते फरार होते. दिनांक 16 मार्च रोजी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना फरार घोषित किले होते. DCP त्रिपाठी यांना फरार घोषित केल्यानंतर मुंबई पोलिसांनी या घटनेची माहिती गृह मंत्रालयाला दिलेली होती. तसेच सौरभ त्रेपाठी यांच्या विरोधात याप्रकरणी कारवाई का करण्यात येऊ नये ? याचे स्पष्टीकरण देण्यात आलेलं होतं. या प्रकरणी सौरभ त्रिपाठी यांनी तक्रारदार यांना फोन करून तक्रार मागे घेण्यास सांगितल्याचाही आरोप असल्याची पोलिसांनी केलेला आहे. याबाबतचे काही ऑडिओ क्लिप पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले आहे. त्यानंतर चौकशी अहवालाच्या आधारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्रिपाठींना निलंबित केलेले होते.
लुक आऊट नोटीस जारी
व्यावसाईक अंगडिया खंडणी वसुली प्रकरणात आरोपी उपायुक्त सौरभ त्रिपाठीविरोधात काल लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे; तर, गुन्हे शाखेने शुक्रवारी त्रिपाठींचे मेहुणे जीएसटी सहाय्यक आयुक्त आशुतोष मिश्रा आणि नोकर पप्पुकुमार गौड यांच्याविरोधात सुद्धा पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.
सौरभ त्रिपाठी यांच्या सूचनेवरून लोकमान्य टिळक (एल.टी.) मार्ग पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कदम, उपनिरीक्षक समाधान जमदाडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) ओम वंगाटे यांनी अंगडिया व्यावसायिकांना अटकाव करीत खंडणी उकळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानुसार, त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.या प्रकरणी निलंबित पोलिस उपायुक्त (DCP) सौरभ त्रिपाठी आणि त्यांच्या वडिलांविरोधातही गुन्हा दाखल आहे. मात्र ते अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही.
गुन्हे शाखेने या प्रकरणात अटक केलेल्या तीन पोलिसांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, तर पुरवणी आरोपपत्रात ते मिश्रा आणि गौड यांच्या कथित भूमिकेबद्दल पुरावे सादर करण्यात आले आहेत. पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख असल्यामुळे शुक्रवारी दंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.या आठवड्याच्या सुरुवातीला तीन पोलिसांची जामिनावर सुटका करण्यात आलेली होती, तर मिश्रा आणि गौड सध्या कारागृहात आहेत. अंगडियाकडून घेतलेले पैसे त्रिपाठीने मिश्राकडे पाठविले होते. त्यानुसार, आतापर्यंत जप्त केलेले पुरावे, जबाब, तसेच ओळख परेडच्या अहवालासहित अनेक महत्त्वपूर्ण माहितीचा या आरोपपत्रात समावेश आहे.
काय असते लुक आऊट नोटीस
लुकआउट नोटिसला लुकआउट सर्क्युलर (LOC) म्हणूनही ओळखले जाते, जे फरार गुन्हेगारांना शोधण्यासाठी प्रसिद्ध केले जातात. तसेच, कायद्याची अंमलबजावणी करणार्या अधिकार्यांना आवश्यक असणार्या फरार व्यक्तींचा प्रवेश आणि निर्गमन प्रभावीपणे प्रतिबंधित करणे आणि त्यांचे परीक्षण करणे यासाठी ही नोटीस जारी करण्यात येते.जर एखाद्या देशाच्या इमिग्रेशन अधिकार्यांकडे कोणत्याही फरार गुन्हेगाराविरुद्ध लुकआउट परिपत्रक असेल तर फरारी व्यक्तीला अधिकारी पकडू शकतात. भारताच्या सर्व आंतरराष्ट्रीय सीमा, विमानतळे व बंदरावर याबाबत सविस्तर माहिती देऊन सूचीत केले जाते.