अर्थकारण

नोटबंदी काळातील CCTV फुटेज सांभाळून ठेवण्याचे सर्व बँकांना RBI चे निर्देश

नवी दिल्ली – 8 नोव्हेंबर 2016 ते 30 डिसेंबर 2016 या कालावधीत झालेल्या नोटाबंदी (Demonetization) काळातील सर्व CCTV रेकॉर्डिंग सांभाळून ठेवा असे निर्देश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने देशातील सर्व बँकांना दिलेले आहे. देशातील तपास यंत्रणा नोटाबंदी काळातील अनेक संशयित प्रकरणांचा तपास करत आहेत. काही खटले न्यायालयात प्रलंबित आहेत ,तर काही बँकांच्या नोटा अदलाबदल संशयित प्रकरणांचा तपास अजून रडारवर असून त्याचा शोध सुरूच आहे. त्यामुळे बँकेतील CCTV फुटेज सांभाळून ठेवा आणि तपासात सहकार्य करावे असे RBI ने आपल्या वेबसाईटवर म्हटलेले आहे. RBI ने आदेशात सांगितलंय की,तपास यंत्रणा बेकायदेशीररित्या नोटांचा साठा करणाऱ्यांची चौकशी करत आहे. RBI ने पुढील आदेश येईपर्यंत सीसीटीव्ही रेकॉर्डिंग सांभाळण्याचे आदेश दिलेत. RBI च्या या आदेशामुळे देशात साडेचार वर्षाहून अधिक नोटाबंदी काळातील घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. अद्याप तपास यंत्रणांची चौकशी पूर्ण झाली नाही हे स्पष्ट होते. RBI च्या डेटानुसार 99 टक्क्याहून अधिक 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत जमा करण्यात आलेल्या होत्या. नोटाबंदी काळात 15 लाख 41 हजार कोटी रूपये चलनात होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 मध्ये देशभरात 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा चलनातून बंद झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर लाखोंच्या संख्येने बँकांच्या बाहेर या नोटा परत करण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या. नोटाबंदीच्या घोषणेच्या 21 महिन्यानंतर RBI ने याबाबत आकडेवारी सादर केली होती. त्यात घोषीत केले होते की, 99.3 % इतक्या जुन्या नोटा बँकांकडे परत आलेल्या आहेत. बुधवारी आरबीआयनं नोटाबंदी काळात 15 लाख 41 हजार कोटी चलनात होते. त्यातील 15 लाख 31 हजार कोटी रूपये परत बँकेत जमा करण्यात आलेले आहेत, अशी माहिती RBI ने दिलेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.