आंदोलन

पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेवर काळी शाई फेकून राष्ट्रवादीतर्फे महागाईचा निषेध

जळगाव दि-3 आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे.याच्या अंतर्गत जळगाव शहरालगत असलेल्या मोहाडी रोडवरील पेट्रोल पंपावर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांतर्फे शाई फेक आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी पेट्रोल पंपावर लावण्यात आलेल्या फलकावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर काळी शाई फेकण्यात येऊन प्रचंड वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून मोदी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. याप्रसंगी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

Show More
Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.