Crime

पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने सपासप घाव घालून निर्घृण हत्या,पतीस अटक

चोपडा दि-30 चोपडा तालुक्यातील शेवरे बु. येथील रहिवाशी नारायण कैऱ्या भिलाला (वय-40) हा त्याची पत्नी गणूबाई नारायण भिलाला (वय 35) आणि मुलगा निलेश नारायण भिलाला (वय 18) यांच्यासमवेत राहतात. नारायण हा शेतात काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. तसेच त्याला दारू पिण्याचे खूप व्यसन होते. नारायण हा दारू पिऊन आल्यावर त्यांच्या घरात नेहमी वाद घालत असे ,याच कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादातून दिनांक 29 मार्च रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास नारायण भिलाला यांनी संतापाच्या भरात त्यांची पत्नी गणूबाई यांच्या डोक्यात लोखंडी कुऱ्हाडीने सपासप वार केले. यात गणूबाई गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना जखमीवस्थेत त्यांचा मुलगा निलेश याने तातडीने साकेगाव जवळील गोदावरी फाऊंडेशनच्या रूग्णालयात दाखल केले. मात्र डाॕक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले.
या गुन्ह्यातील संशयित आरोपी व महिलेचा पती नारायण भिलाला याला अडावद पोलीसांनी अटक केलेली आहे. महिलेचा मुलगा निलेश नारायण भिलाला याच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात आरोपी नारायण भिलाला याचे विरोधात भा.द.वी. कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण दांडगे हे करीत आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.