क्राईम

पत्नी व दोन अपत्यांना सोडून पती दुसरीसोबत पसार

यावल – तालुक्यातील नायगाव येथे शासकीय सेवेत असलेल्या एकाने स्वतःची पत्नी व दोन मुले सोडून सावखेडासीम येथील दोन मुलांच्या आई असलेल्या महिलेस घेऊन रफूचक्कर झाल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत नायगाव येथील एका 30 वर्षीय विवाहित महिलेने यावल पोलीस ठाण्यात पती हरविल्याची तक्रार दिलेली आहे.तसेच संबंधित विवाहितेने पती व त्या महिलेच्या विरोधात यावल पोलिसात पती व त्या विवाहितेने शिवीगाळ केल्याचीही माहिती दिलेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की यावल तालुक्यातील नायगाव येथील 30 वर्षीय तक्रारदार विवाहितेचे पती अशरफ हुसेन तडवी हे सोमवारी सावरखेडासीम येथील दोन मुलांची आई असलेल्या एका महिलेला सोबत घेऊन कुठे तरी निघून गेले. तेव्हा याबाबत विवाहितेने पती अशरफ यास मोबाईलवर कॉल करुन याबाबत जाब विचारला असता, पती अशरफ व ती संबंधित महिला यांनी तक्रारदार महिलेला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.संबंधित अशरफ तडवी हे शासकीय सेवेत असल्याचे तक्रारदार विवाहितेने तक्रारीत म्हटलेले आहे.विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोहेकाॕ सुनिल तायडे हे करीत आहे. या घटनेमुळे नायगाव परिसरात समाजमन सुन्न झाल्याचे दिसत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.